Join us  

सेवानिवृत्त अधिका-यांच्या बहुपदांना सरकारचा चाप, विभागांतील परस्पर नियुक्ती करण्यावर प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 4:46 AM

सेवानिवृत्त आयएएस वा राज्य सरकारी अधिका-यांना विविध न्यायाधिकरण, प्राधिकरण वा नियामक आयोगावर संबंधित विभागांनी परस्पर नियुक्ती करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सेवानिवृत्त आयएएस वा राज्य सरकारी अधिका-यांना विविध न्यायाधिकरण, प्राधिकरण वा नियामक आयोगावर संबंधित विभागांनी परस्पर नियुक्ती करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबत परिपत्रक काढले. एका सेवानिवृत्त अधिकाºयाची एकाचवेळी एकापेक्षा अधिक पदांवर नियुक्ती केल्याचे प्रकार घडल्यानंतर विभागाने हे पाऊल उचलले आहे. आता कोणत्याही विभागाने निवृत्त अधिकाºयाची नियुक्ती करण्यासंबंधीची फाईल ही सामान्य प्रशासन विभागांतर्गत नियामक मंडळ कक्षाकडे पाठवावी लागेल. एकाच अधिकाºयाची नियुक्ती विविध पदांवर करण्यासंदर्भात भिन्न कार्यालयांकडून प्रस्ताव आल्यास मुख्य सचिव संबंधित विभागांना तशी कल्पना देतील. यामुळे एकाचवेळी विविध पदांवर काम करण्याची बड्या सेवानिवृत्त अधिकाºयांची संधी हुकणार आहे.