Join us  

२०३० पर्यंत औषधमुक्त निरोगी जीवनाचा संकल्प, मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 2:16 AM

अ‍ॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी, शिआत्सू आदी औषधविरहित व दुष्परिणामरहित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

मुंबई : अ‍ॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी, शिआत्सू आदी औषधविरहित व दुष्परिणामरहित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या पद्धती आमच्या प्राचीन वारसा असून, त्या वापरल्याने माणूस केवळ निरोगीच राहतो असे नव्हे, तर त्यास दीर्घायुष्यही मिळते, असे मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ जी. हेगडे यांनी म्हटले आहे. आंतरराष्टÑीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहाच्या सांगतेवळी मुंबईत तृतीय अखिल भारतीय परिषदेमध्ये ते बोलत होते. २०३० पर्यंत औषधमुक्त निरोगी जीवनाचा संकल्प या वेळी अधोरेखित करण्यात आला.या उपचार पद्धतीशी संबंधित सर्व संस्थांच्या माध्यमातून देशभर जनजागृती अभियान चालवण्यात आले. या संपूर्ण आयोजनात लोकमत समूहाने मीडिया पार्टनरची भूमिका बजावली. १८ ते २४ सप्टेंबरपर्यंत चाललेल्या या सप्ताहात देशाच्या कानाकोपºयात १५ हजारांहून उपचारकर्त्यांनी दररोज दोन तास मोफत सेवा दिली. याचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला.संयोजक जै. रि. अनिल जैन यांनी सांगितले की, जैन रिफ्लेक्सोलॉजीमध्ये संशोधन सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जैन रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.पतंजली विद्यापीठ, महाराष्टÑाचे प्रमुख सुरेश यादव यांनी या उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये सांगितली.आंतरराष्टÑीय निसर्गोपचार संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार यांनी नैसर्गिक उपचाराच्या क्षेत्रात भारत सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या वेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश जैन (मुंबई) यांची उपस्थिती होती.वीस वर्षांहून अधिक काळ अ‍ॅक्युप्रेशर उपचाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाºयांना ‘अ‍ॅक्युप्रेशर आयकॉन आॅफ इंडिया’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. यात प्रामुख्याने प्रो. डॉ. पी. बी. लोहिया, डॉ. अनंत जी. बिरादार व डॉ. नवीनचंद्र शाह (मरणोत्तर) यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संयोजक जै. रि. अनिल जैैन, सह संयोजक दिलीप उरणकर, नीलेश कांकरिया (सुरत), संतोष पांडे (मुंबई), चंद्रकांत भाभेरा (मुंबई), मनोज बोरा, ललित गांधी, प्रभा देसरडा (औरंगाबाद) यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :औषधं