Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:43 PM2021-06-16T13:43:41+5:302021-06-16T15:27:40+5:30

Coronavirus Vaccine: रहिवाशांना वेगवेगळ्या दिवशी भलत्याच रुग्णालयांची प्रमाणपत्रं मिळाली; पडताळणीत धक्कादायक माहिती उघड

Residents of Mumbai housing society allege vaccination scam suspect they were given fake Covid shots | Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले

Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले

googlenewsNext

मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याची गरज आहे. सरकारकडून सर्वसामान्यांना मोफत लस दिली जात आहे. तर लसीची किंमत परवडू शकणाऱ्या व्यक्ती खासगी रुग्णालयांमधून लस घेत आहेत. मात्र याचाच गैरफायदा काही व्यक्तींकडून घेतला जात आहे. मुंबई उपनगरातील कांदिवलीत घडलेल्या प्रकारामुळे ४०० जणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Residents of Mumbai housing society allege vaccination scam suspect they were given fake Covid shots)

पतीला तोंडानं ऑक्सिजन देणाऱ्या 'त्या' महिलेचं पुढे काय झालं? काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत ३० मे रोजी ४०० जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. मात्र या व्यक्तींना लसीकरणानंतर मिळालेलं प्रमाणपत्र संशयास्पद आहे. त्यामुळे आपल्याला खरंच कोरोना लस देण्यात आली की नाही, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे.

भयानक! दहा दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही; जिवंतपणी आईसह पाच मुलांचा झाला सांगाडा

हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. त्यात ४०० जणांना कोविशील्डचा डोस देण्यात आला. यासाठी सोसायटीनं महेंद्र नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली होती. एका मोठ्या रुग्णालयाकडून लसीकरण कॅम्प आयोजित करत असल्याचा दावा त्यानं केला. मात्र लसीकरण सुरू असताना ते एका मोठ्या रुग्णालयाकडून होत असल्यासारखं दिसत नव्हतं. लसीकरण झाल्यानंतर बरेच दिवस रहिवाशांना प्रमाणपत्र मिळालं नाही.

प्रमाणपत्र न मिळाल्यानं सोसायटीनं संबंधिताशी संपर्क साधला. त्यानंतर रहिवाशांना प्रमाणपत्रं मिळाली. मात्र ती वेगवेगळ्या रुग्णालयांची होती.  कोणाला नानावटी, कोणाला बीएमसीचं नेस्को कोविड सेंटर, तर कोणाला शिवम रुग्णालयाचं प्रमाणपत्र मिळालं. विशेष म्हणजे ही प्रमाणपत्रं लोकांना वेगवेगळ्या दिवशी मिळाली. प्रमाणपत्रं पडताळून पाहण्यासाठी रहिवाशांनी त्या त्या रुग्णालयांशी संपर्क साधला. मात्र अशा प्रकारे या नावांनी कोणाचंही लसीकरण न झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.

Web Title: Residents of Mumbai housing society allege vaccination scam suspect they were given fake Covid shots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.