Join us  

पगारवाढीच्या मुद्यावरून निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:07 AM

पगारवाढीच्या मुद्यावरून आक्रमकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्यावरून आक्रमक झाले ...

पगारवाढीच्या मुद्यावरून आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा १०,००० कोविड भत्ता हीच पगारवाढ असून ११ महिन्यांची थकबाकी नामंजूर करण्यात आली आहे. याबाबत निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. सात दिवसांत थकबाकी न देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशारा पालिका मार्ड संघटनेने दिला.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून मुंबईला काेराेनाने विळखा घातला. रुग्णांची संख्या वाढल्याने पालिका रुग्णालयावरील ताण वाढला. सर्वच निवासी डॉक्टर कोविड कामावर रुजू झाले. त्यांच्या सेवेची दखल घेत पालिकेने प्रोत्साहन म्हणून पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह कोविडसाठी काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना १०,००० रुपये कोविड भत्ता लागू केला. त्याचदरम्यान मे २०२० मध्ये सरकारने निवासी डॉक्टरांचा पगार अर्थात विद्यावेतन १००० रुपयांनी वाढवले. मात्र ११ महिने झाले तरी पालिका रुग्णालयातील ३००० डॉक्टरांना १०,००० रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. पालिकेने मात्र थकबाकी देण्यास नकार दिला आहे. कोविड भत्ता हीच पगार वाढ आहे. त्यामुळे थकबाकी नामंजूर करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्राद्वारे जाहीर केले आहे. यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.

* सात दिवसांचा अल्टिमेटम

थकबाकी न देण्याच्या पालिकेच्या निर्णयानंतर मार्डने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात पालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पुढील सात दिवसांत हा निर्णय मागे न घेतल्यास किंवा थकबाकी देण्याचा निर्णय झाला नाही तर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशारा दिला आहे.

......................

.......................