Join us  

सरपंच पदाचे आरक्षण ३ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:07 AM

ठाणे : जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता ३ फेब्रुवारीला सरपंच पदाची आरक्षण सोडत संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांच्या ...

ठाणे : जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता ३ फेब्रुवारीला सरपंच पदाची आरक्षण सोडत संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांच्या नियंत्रणात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी दिले.

सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्याआधी २९ जानेवारीला निवडणूक निकालाची अधिसूचना जाहीर होणार आहे. त्यानंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीच्या वेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या मार्गदर्शन सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. यापैकी आठ ग्रामपंचायतींचे ४१८ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यानुसार एक हजार ४११ विजयी उमेदवार घोषित झाले आहेत. यामध्ये ७८६ महिलांसह ६२५ पुरुष विजयी झाले. आता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर किती महिला सरपंच पदाच्या मानकरी ठरणार, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.