Join us  

धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गात आरक्षणासाठी बापू बिरू वाटेगावकर मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 5:00 AM

मुंबई : धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गात आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘बोरगावचा ढाण्या वाघ’ म्हणून प्रसिद्ध असलेले बापू बिरू वाटेगावकर मैदानात उतरले आहेत

मुंबई : धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गात आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘बोरगावचा ढाण्या वाघ’ म्हणून प्रसिद्ध असलेले बापू बिरू वाटेगावकर मैदानात उतरले आहेत. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नागपूरमध्ये ५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला धनगर मेळावा समाजाची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून तो उधळून लावू, असा इशारा बापूंनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.वाटेगावकर म्हणाले की, ‘र’च्या जागी ‘ड’ झाल्याने समाजाची उपेक्षा होत आहे. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर धनगर आरक्षणाचा सरकारला विसर पडला आहे. याउलट धनगर समाजाने नेतृत्व दिलेल्या नेत्यांनी मंत्रिपद, खासदारकी आणि आमदारकी मिळाल्याने मौन धारण केले आहे. त्यामुळे सरकारमधील एकाही धनगर नेत्याला यापुढे धनगर समाजाची दिशाभूल करू देणार नसल्याचे सांगत नागपूरमधील महात्मे यांचा मेळावा कोणत्याही परिस्थितीत उधळून लावण्याचा इशारा वाटेगावकर यांनी दिला आहे.