Join us  

विद्यापीठाकडे समितीने सादर केला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 6:06 AM

मुंबई : निकालाचा गोंधळ सुरू असतानाच, मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू झाल्या.

मुंबई : निकालाचा गोंधळ सुरू असतानाच, मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू झाल्या. त्यातच ‘बीएमएस’चा पेपर फुटला. या प्रकरणाची तत्काळ शहानिशा करण्यासाठी विद्यापीठाने एक सदस्यीय समिती गठित केली होती. या समितीने सोमवारी संध्याकाळी उशिरा विद्यापीठाला अहवाल सादर केला आहे. या अहवालावर मंगळवार, २१ नोव्हेंबरला कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्याबरोबरच्या बैठकीत चर्चा होणार आहे. बीएमएस पेपर फुटीप्रकरणी विद्यापीठाने नेमलेला सदस्य शनिवारी एमव्हीएम महाविद्यालयात गेला होता. त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा केली आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले. त्यानंतर, एक सविस्तर अहवाल विद्यापीठाला सादर केला आहे. पोलिसांचा अहवाल मिळाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईविद्यापीठ