Join us  

मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती

By admin | Published: December 24, 2016 3:38 AM

बोरीवली येथील अनेक मलनिस्सारण वाहिन्यांची गुरुवारी दुरुस्ती करण्यात आल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. येथील शिंपोली

मुंबई : बोरीवली येथील अनेक मलनिस्सारण वाहिन्यांची गुरुवारी दुरुस्ती करण्यात आल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. येथील शिंपोली, शिवाजी नगर, एमएचबी, दुर्गाधाम चाळ आणि साईप्रसाद मित्रमंडळ येथील रहिवासी मलनिस्सारण वाहिन्यांच्या नादुरुस्तीमुळे त्रस्त झाले होते. अखेर या प्रकरणी त्यांनी याची तक्रार स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांच्याकडे केली. शेट्टी येथील परिस्थितीचा आढावा घेत बुधवारी तसेच गुरुवारी मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती करून घेतली. (प्रतिनिधी)