Join us

रस्ते खड्डेमुक्त करून दिलासा द्या !....सिटीजन

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST


सिटीजन

रस्ते खड्डेमुक्त करून दिलासा द्या !

दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या अनेक विभागातील रस्त्यांना पावसामुळे चांगलेच खड्डे पडले आहेत. त्याच खड्डयांचे वेगवेगळे आकार पाहून ते बुजवण्यासाठी किती वेळ लागणार, हा प्रश्न उद्भवतो,पण त्यावरून खड्ड्यांची विभागणी होऊन राजकारण चालू आहे. बहुतेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले असून,त्यातूनच वाहन चालकांना,विद्यार्थ्यांना व जनतेला आपला जीव सांभाळून त्याच मार्गे प्रवास करावा लागतो. महानगरपालिका प्रत्येक वेळेस सर्वसामान्य नागरिकांकडून कर वसूल करते तरीदेखील प्रत्येक ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहण्यास मिळते. तसेच याच ठिकाणच्या खड्डयांमध्ये दलदल निर्माण होऊन रोगराईला आमंत्रण मिळते. ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, हेच समजत नाही, या खड्ड्यांमुळे अनेक प्रकारचे अपघातही होत असून आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर प्रसारमाध्यमांनी महानगरपालिकेवर टीकेचे शस्त्र सोडल्याशिवाय महानगरपालिकेला जाग येत नाही. महानगरपालिकेने सणांच्या पार्श्वभूमीवर तरी खड्डे बुजवून मुंबईकरांचा या वर्षाचा प्रवास तरी सुखरुप करावा जेणेकरून नागरिकांना सणा-वारात दिलासा मिळेल.

संतोष जाधव, गांधीनगर,जोगेश्वरी (पूर्व)