हमखास तुंबणारी ठिकाणे पूरमुक्त करा
By admin | Updated: July 6, 2015 23:33 IST
प्रातिनिधिक फोटो वापरावेत
हमखास तुंबणारी ठिकाणे पूरमुक्त करा
प्रातिनिधिक फोटो वापरावेत........................हॅलो लीड........................हमखास तुंबणारी ठिकाणे पूरमुक्त कराआयुक्तांनी अधिकार्यांना ठणकावलेब्रिमस्टोवॅड प्रकल्पाने आणला फेसमुंबई: पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आणलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या खर्चानेच पालिका प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला आहे़ गेल्या महिन्यात मुंबईची तुंबापुरी झाल्यानंतर या प्रकल्पाच्या यशावरच प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे़ त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून न राहता पहिल्याच पावसात तुंबलेली दहा महत्त्वाची ठिकाणे आधी प्राधान्याने पूरमुक्त करण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी अधिकार्यांना ठणकावले आहे़२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणण्यात आला़ या प्रकल्पामुळे ताशी २५ मि़मी़ पावसाचे पाणी वाहून नेण्याची पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ५० मि़मी़ पर्यंत वाढणार होती़ परंतु प्रकल्पाच्या दहा वर्षांनंतरही दरवर्षी त्याच ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे चित्र आहे़ १९ जून २०१५ रोजी मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले़ तेव्हा पाणी तुंबण्याची ठिकाणे पुन्हा तीच होती़ ही अवस्था पहिल्याच पावसाने केल्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा नुकताच आढावा घेण्यात आला़ काँक्रिटीकरणामुळे अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यास जागा उरलेली नाही, असे प्रकर्षाने जाणवले़ परंतु ही सबब देऊन अधिकार्यांना आपली सुटका करुन घेता येणार नाही़ त्यामुळे आधी अशा दहा हमखास तुंबणार्या ठिकाणी पाणी वाहून जाण्याचे अडथळे दूर करण्याची मुदतच आयुक्तांनी अधिकार्यांना दिली आहे़ .....................(चौकट)ब्रिमस्टोवॅड प्रकल्प म्हणजे काय?ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत आठ पंपिंग स्टेशन उभारणे, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, पर्जन्य जलवाहिन्या बदलणे अशी कामे आहेत़ अशी एकूण ५८ कामं प्रस्तावित असून याचा खर्च १२०० कोटी व डेडलाईन २०११ होती़ मात्र आतापर्यंत २६ कामं पूर्ण झाली असून डेडलाईन २०१९ वर पोहोचली आहे़ तर खर्चाचा आकडा चार हजार कोटी रुपयांच्या घरात आहे़ या प्रकल्पातील दिरंगाई आणि वाढलेल्या खर्चावर गतवर्षी कॅगनेही ताशेरे ओढले आहे़...............................विलंबाचे कारण काय?अनेक ठिकाणी या प्रकल्पांच्या मार्गात पर्यावरण खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्राचा अडसर निर्माण झाला आहे़ तसेच नदी व नाल्यांच्या परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन रखडल्यामुळे याचा फटका या प्रकल्पाला बसल्याचा युक्तिवाद अधिकारी मांडतात़ ...............................ही ठिकाणे हमखास पाण्यातपालिकेच्या सर्वेक्षणानुसार २४० ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबते़ यापैकी हमखास पाणी तुंबणारी ४० ठिकाणं आहेत़ तर १९ जून रोजी या प्रमुख ठिकाणी पाणी तुंबले होते़ सायन रोड नं़ २४, हिंदमाता, दादर टी़टी़, अंधेरी विरा देसाई रोड, खार सबवे, मिलन सवबे, भांडुप सोनापुरा, परळ गांधी मार्केट, नायर दंत रुग्णालय परिसर, माटुंगा स्टेशन, कुर्ला कमानी नगर असे काही परिसर हमखास तुंबतात़ मात्र काँक्रिटीकरणामुळे अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नाही, असा बचाव अधिकारी करीत आहेत़ ........................