Join us  

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 5:17 AM

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार व रविवार असा दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक याआधीच जाहीर करण्यात आल्यामुळे, या मार्गावरील रविवार सकाळचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर माटुंगा स्थानकावरून रविवारी सकाळी १०.५७ ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत, धिम्या मार्गावर धावणाºया सर्व उपनगरीय लोकल माटुंगा ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सर्व लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि ठाणे स्थानकापासून त्या डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहुर स्थानकासाठी डाउन धिम्या मार्गाच्या सेवा बंद असतील. ब्लॉकदरम्यान या स्थानकांवरील प्रवासी घाटकोपर, भांडुप, मुलुंडवरून प्रवास करू शकतील. कल्याण येथून सकाळी ११.०४ पासून दुपारी ३.०६ वाजेपर्यंत सुटणाºया जलद गाड्या निर्धारित थांब्यांशिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबतील. त्या अंतिम स्थानकावर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने पोहोचतील.वाशी-पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकलहार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी येथे जाणाºया, तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाºया सर्व उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी-पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील, तसेच ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा आहे.

टॅग्स :मुंबई लोकलमध्ये रेल्वे