Join us  

आता रक्तदात्यांची नोंदणी! केवळ विक्रमासाठी रक्तदान नको, ‘आॅपरेशन रेडिनेस २०१७’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 2:24 AM

रक्तदानासाठी नेहमीच तयार असलेल्या रक्तदात्यांची माहिती गोळा करण्याची मोहीम फेडरेशन आॅफ बॉम्बे ब्लड बँक्स संस्थेने सुरू केली आहे.

मुंबई : रक्तदानासाठी नेहमीच तयार असलेल्या रक्तदात्यांची माहिती गोळा करण्याची मोहीम फेडरेशन आॅफ बॉम्बे ब्लड बँक्स संस्थेने सुरू केली आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. झरिन भरूचा यांनी या मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. केवळ रेकॉर्ड करण्यासाठी रक्तदान शिबिर घेतल्याने बरेच रक्त वाया जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.भरूचा म्हणाल्या की, वर्षभर मुंबईतील रुग्णालयांना रक्ताची गरज असते. मात्र रक्तदात्यांअभावी हा पुरवठा वेळेत करणे शक्य होत नाही. आधीच मुंबईतील रक्तदानाचे प्रमाण हे १० टक्क्यांहून कमी आहे. याउलट इतर देशांत रक्तदानाचे प्रमाण २० ते ४० टक्क्यांच्या घरात आहे. अनेकवेळा रेकॉर्ड करण्यासाठी रक्तदान शिबिरे होतात. त्यात आवश्यकतेहून अधिक रक्त एकाचवेळी जमा होते. याउलट डेंग्यू, लेप्टो असे साथीचे आजार येताच रक्ताची चणचण भासू लागते. त्यामुळे नेहमी रक्तदान करणाºया दात्यांची माहिती संकलित करून गरज भासेल तेव्हा रक्तपुरवठा करण्यासाठी ‘आॅपरेशन रेडिनेस २०१७’ ही मोहीम सुरू केली आहे.फेडरेशनने गतवर्षी सुमारे २ लाख ८० हजार युनिट रक्त जमा केले होते. याउलट मुंबईकरांकडून ३ लाख युनिटची मागणी होती. हीच परिस्थिती प्लेटलेट्सच्या बाबतीत दिसून आली. ७ हजार युनिट्स प्लेटलेट्सची गरज असतानाही केवळ ६ हजारांच्या आसपास प्लेटलेट्सचा पुरवठा करणे शक्य झाल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले.अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोधआतापर्यंत पथदर्शी प्रकल्पामध्ये एक हजार रक्तदात्यांची फेडरेशनने नोंदणी केल्याचे उपाध्यक्ष डॉ. एस.बी. राजाध्यक्ष यांनीसांगितले. ते म्हणाले की, सुमारे १० हजार रक्तदात्यांची नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्याचा मानस आहे.तीन महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून चारवेळा हे दाते आवश्यक असेल त्या वेळी रक्तदान करतील. त्यामुळे ठरावीक रक्तगटाच्या रुग्णाला हवे त्या वेळी पुरवठा करणे शक्य होईल. फेडरेशनच्या संकेतस्थळावरून दात्यांना आणि गरजूंना रक्तदान व पुरवठा करणाºया पेढ्यांची माहिती मिळू शकेल.अफवामुळे रक्तसंकलन कमी‘रक्तदान केल्याने महिलांचे वजन कमी होते’, ‘रक्तदानामुळे आजार होतात’ अशा विविध अफवांमुळे रक्त संकलन कमी होत असल्याचे फेडरेशनच्या सचिव डॉ. निझारा यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की, दर १५ दिवसांतून एकदा प्लेटलेट्स देता येतात. एकटा प्लेटलेट्स देणारा दाता रक्ताच्या पिशवीतून निर्माण होणाºया ६ प्लेटलेट्सची बरोबरी करतो. त्यामुळे रक्तदानाबरोबर प्लेटलेट्सदात्यांची संख्याही वाढवण्याचे काम या मोहिमेत केले जाईल.

टॅग्स :मुंबई