Join us  

फुकट्या प्रवाशांकडून ५९ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 6:05 AM

मध्य रेल्वेने आता फुकट्या प्रवाशांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेने आता फुकट्या प्रवाशांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. एप्रिल ते जून या ३ महिन्यांत मध्य रेल्वे प्रशासनाने ५९ कोटी ३६ लाख रुपये वसूल केले.जून महिन्यात दंडाच्या स्वरूपात १७ कोटी २० लाख रुपये वसूल केले गेले. दंड वसूल केलेल्या रकमेमध्ये यंदा ३४.६२ टक्के वाढ झाली आहे. जून महिन्यात आरक्षित तिकिटावर दुसऱ्या प्रवाशाने प्रवास करण्याच्या ३९१ प्रकरणांमध्ये दंड म्हणून ४ लाख रुपये वसूल झाले.एप्रिल ते जून या कालावधीत विनातिकीट प्रवासी, जास्त प्रवास करूनही कमी अंतराचे तिकीट घेणाºया प्रवाशांविरोधात १० लाख ८५ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली. गतवर्षी या कालावधीत हे प्रमाण ९ लाख ८३ हजार होते. त्यामध्ये यंदा यात १०.४२ टक्के वाढ झाली आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी केले आहे.