मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; ११५.८ मिमीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:58 PM2020-10-15T15:58:44+5:302020-10-15T15:59:05+5:30

Record break rain : कुलाबा येथे ११५.८ तर सांताक्रूझ येथे ८६.५ मिमी रेकॉर्ड ब्रेक नोंद

Record break rain in Mumbai; 115.8 mm recorded | मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; ११५.८ मिमीची नोंद

मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; ११५.८ मिमीची नोंद

googlenewsNext

मुंबई : एव्हाना ऑक्टोबच्या मध्यात मान्सून मुंबईसह राज्यातून परतीला लागलेला असतो. मात्र यावर्षी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या परतीला ब्रेक लागला आहे. उलटपक्षी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई शहरासह उपनगरात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत कुलाबा येथे ११५.८ तर सांताक्रूझ येथे ८६.५ मिमी झालेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात गेल्या दहा वर्षांत एवढा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिनाही पावसाने पुरेपुर भरून काढला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने तेलंगणासह राज्यात मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. विशेषत: राज्यात सोलापूरसह लगतच्या परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबई शहरासह उपनगरात बुधवारी सायंकाळी ५ वाजता सुरु झालेला पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत सुरु होता. मुंबईत सकाळी मात्र काही काळ पावसाने विश्रांती घेतली. दुपारी तर रखरखीत ऊनं पडले. त्यात झालेल्या हवामान बदलामुळे मुंबईकरांच्या शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच स्थिती असतानाच पुन्हा एकदा मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट सुरु झाला. आणि सर्वदूर पुन्हा एकदा पावसाच्या सरींनी वर्षाव सुरु केला. दरम्यान, हा पाऊस सुरु असतानाच २ ठिकाणी घरांचा भाग कोसळला. ५ ठिकाणी झाडे कोसळली. १४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

..............................

१४ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत २ हजार ४८० मिलीमीटर पाऊस पडला आहे. ही टक्केवारी १२३.२५ आहे.

..............................

Web Title: Record break rain in Mumbai; 115.8 mm recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.