Join us  

सहा हायकोर्ट न्यायाधीश कायम करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:59 PM

प्रकाश देऊ नाईक, मकरंद सुभाष कर्णिक, स्वप्ना संजीव जोशी, किशोर कलेश सोनावणे, संगीतराव श्यामराव पाटील आणि नूतन दत्ताराम सरदेसाई या मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकमताने केली आहे. या सर्वांची २८ मार्च २०१६ रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती.

मुंबई : प्रकाश देऊ नाईक, मकरंद सुभाष कर्णिक, स्वप्ना संजीव जोशी, किशोर कलेश सोनावणे, संगीतराव श्यामराव पाटील आणि नूतन दत्ताराम सरदेसाई या मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकमताने केली आहे. या सर्वांची २८ मार्च २०१६ रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती.उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या कॉलेजियमने गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी या सहा न्यायाधीशांना कायम करण्याच्या केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व महाराष्ट्राच्या राज्यपालांनी संमती दिल्यानंतर ही नावे सुप्रीम कोर्टाकडे पाठविली गेली होती.या न्यायाधीशांविरुद्ध काही तक्रारीही केल्या गेल्या होत्या. परंतु त्या खोट्या, निराधार व थिल्लर स्वरूपाच्या असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज नाही, असे नमूद करून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. जे. चेलमेश्वर व न्या. रंजन गोगोई यांच्या कॉलेजियमने अन्य सकारात्मक बाबी लक्षात घेऊन त्यांना कायम करण्याची शिफारस केली.हे सहा न्यायाधीश कायम झाल्यावर उच्च न्यायालयातील कायम न्यायाधीशांची संख्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांसह ५६ होईल. याखेरीज गेल्या वर्षी ५ जून रोजी नेमलेले १४ अतिरिक्त न्यायाधीश अद्याप कायम व्हायचे आहेत.

टॅग्स :न्यायालय