Join us  

सागरी किनारा संरक्षण प्रकल्पास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 5:08 AM

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डची ७३ वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : शाश्वत सागर किनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत माहिम, मरिन ड्राइव्ह, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या समुद्र किनारा संरक्षण प्रकल्पाला मान्यता देण्यात येत असून, ही काम प्राधान्याने सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डची ७३ वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत सागर किनारा संरक्षण प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ६४३ कोटी ५० लाख रुपये इतके कर्ज घेण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. बोर्डाच्या रुपये ३२१ कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्प (बजेट) मान्यता दिली. मुंबई-मांडवा (अलिबाग) रो-रो सेवा सुरू झाल्यानंतरच्या संभाव्य वाहतूक वाढीच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन करावे, पार्किंगची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. विविध ठिकाणच्या जेटी प्रकल्पालाही त्यांनी मान्यता दिली.मेरिटाइम बोर्डाच्या विविध प्रकल्प, तसेच विविध मागण्याबाबत व ठरावाबाबतचे सादरीकरण मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांनी केले, तसेच विविध खासगी संस्थांनी जेटी विकास, रेल्वे, रस्ते याबाबतचे सादरीकरण केले.डहाणूत जेटी उभारणारकोस्ट गार्डला डहाणू येथे जेटी उभारण्यास सोमवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई-मांडवा (अलिबाग) रो-रो सेवा प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :मुंबई