Join us  

‘त्या’ टॅक्सी चालकांवर लगाम लावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:37 AM

मुंबई ही कधीच विश्रांती घेत नाही, असे म्हणतात. यामुळे २४ तास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरूच असते. रात्री उशिरा घरी परतणा-यांसाठी टॅक्सी हा आधार आहे

मुंबई : मुंबई ही कधीच विश्रांती घेत नाही, असे म्हणतात. यामुळे २४ तास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरूच असते. रात्री उशिरा घरी परतणा-यांसाठी टॅक्सी हा आधार आहे. पण रात्री उशिरा विमानतळावरून घरी परतणाºया प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत त्यांची आर्थिक लूटमार केली जात असून यावर लगाम लावण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.रविवारी रात्री एका प्रवाशाने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टॅक्सी चालकाला कलानगरपर्यंत सोडण्यास सांगितले. या वेळी त्या टॅक्सी चालकाने ४०० रुपये होतील असे सांगितले. विमानतळ ते कलानगरपर्यंत रात्रभाडे जास्तीतजास्त १८० ते २०० रुपये होते. मात्र टॅक्सी चालकाने थेट ४०० रुपयांची मागणी केली. हा टॅक्सी चालक एका गॅरेजमध्ये काम करणारा होता. तसेच रात्रकालीन शिफ्टमध्येकाम करणाºया महिलांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी एखादी महिला अशा टॅक्सीमध्ये बसली तर ती सुरक्षित ठिकाणी जाऊ शकेल का, याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच जर काही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.मुळात रात्रपाळीत काम करणारे बहुतांशी टॅक्सी चालक नशेत असतात. त्यांच्याकडे परवाना, बॅच, वाहनाची कागदपत्रे नसतात. शिवाय चालकाचा योग्य तो गणवेशही नसतो. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी वाहन चालवताना पोलिसांच्या कारवाईची कोणतीच भीती नसल्याचे टॅक्सी चालक बिनदिक्कत सांगतात. यावर वाहतूक पोलिसांसह संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे.शेअर रिक्षावर नियंत्रण कधी आणणार?मानखुर्द आणि गोवंडी परिसरात वाहतूक विभागाची परवानगी न घेता १० आॅटोरिक्षांचे शेअर स्थानक आहे. मानखुर्द रेल्वे स्थानक पश्चिम ते महाराष्ट्रनगर (निरंकारी भवन) यादरम्यान शेअरिंग आॅटोरिक्षा चालतात. मानखुर्द रेल्वे स्थानकापासून महाराष्ट्रनगर (निरंकारी भवन)पर्यंतचे अंतर जास्तीतजास्त ८०० ते ९०० मीटर आहे. यासाठी प्रवाशांकडून १० रुपये आकारले जातात. एका रिक्षात चार-पाच प्रवाशांना बसवले जाते. त्यामुळे शेअर रिक्षांच्या दरांवर आणि अशा अवैध रिक्षांवर नियंत्रण कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वांद्रेत रिक्षाकोंडी!वांद्रे-कुर्ला संकुलामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाºया वांद्रे स्थानकाच्या पूर्वेला बेशिस्त रिक्षा चालकांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काही रिक्षाचालक स्थानकालगत असणाºया रिक्षा स्टॅण्डवर रांग लावण्याऐवजी रस्त्यावर रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी इतर वाहनांच्या रांगा पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत पोहोचतात.