Join us  

तूर डाळ विक्रीमागे रेशन दुकानदारांना प्रतिकिलो ३ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:02 AM

तूर डाळीकरिता रास्तभाव दुकानदारांना आता प्रतिकिलो तीन रुपये एवढे कमिशन देण्यात येणार आहे.

मुंबई : रास्तभाव दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी अधिकृत रास्तभाव दुकानदारांमार्फत वितरित होणाऱ्या तूर डाळीकरिता रास्तभाव दुकानदारांना आता प्रतिकिलो तीन रुपये एवढे कमिशन देण्यात येणार आहे.यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार या दुकानदारांना अन्न धान्य वितरणासाठी पॉस मशिनद्वारे होणाºया व्यवहारानुसार वितरीत तूर डाळीस १.५० रु. प्रतिकिलो व पॉस मशिन व्यतिरिक्त होणाºया तूरडाळीस ७० पैसे प्रतिकिलो एवढे कमिशन (मार्जिना) देण्यात येत होते. तूरडाळीचा विक्री दर ५५ रुपये प्रतिकिलो आहे. तूर डाळीला अन्नधान्याप्रमाणे दीड रुपया आणि ७० पैसे असा दर देण्यात येत होता. तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी कमिशन वाढविण्यात आले आहे.