संवेदनशील टाटांना भावला 'ताज' हॉटेलमधील कर्मचारी, खास फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:12 PM2021-09-25T16:12:35+5:302021-09-25T16:15:43+5:30

कोविड काळातही त्यांनी 1500 कोटी रुपयांचा निधी दिला, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपलं हॉटेल ताज हेही खुलं केलं होतं.

Ratan Tata's share emotional pic of rain in mumbai Taj Hotel staff, special photo shared | संवेदनशील टाटांना भावला 'ताज' हॉटेलमधील कर्मचारी, खास फोटो केला शेअर

संवेदनशील टाटांना भावला 'ताज' हॉटेलमधील कर्मचारी, खास फोटो केला शेअर

Next
ठळक मुद्देटाटांनी इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोत ताज हॉटेलमधील एक कर्मचारी कुत्र्याच्या डोक्यावर छत्री धरुन उभा असल्याचं दिसतं. 'ताजचा हा कर्मचारी अतिशय दयाळू आहे.

मुंबई - राजधानी मुंबईचापाऊस म्हणजे राज्यात चर्चेचा विषय असतो. दगदग आणि धावपळीच्या मुंबईत पाऊसही मुसळधार कोसळतो. या पावसाने अनेकदा जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय. कित्येकदा लोकल सेवेवरही याचा परिणाम झालाय. मात्र, याच पावसात कुठं वयोवृद्ध आजी-आजोबाला आधार देणारी माणसं दिसतात. तर, कुठं प्राणी मात्रांवर दया दाखवणारी प्रेमळ व्यक्ती दिसतात. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि संवेदनशील उद्योजक रतन टाटा यांनी मुंबईतील पावसाचा असाच एक फोटो शेअर केला आहे. 

रतन टाटा हे देशातील नामवंत उद्योजक असून अतिशय संवेदनशील व्यक्तीमत्व आहे. त्यामुळेच, यांच्या नेतृत्वातील टाटा ग्रुप नेहमीच देशावरील संकटावेळी मदतीला धावून येतो. आपल्या कृतीतून ते भावनिकता जपल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय. कोविड काळातही त्यांनी 1500 कोटी रुपयांचा निधी दिला, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपलं हॉटेल ताज हेही खुलं केलं होतं. रतन टाटा यांनी याच ताज हॉटेलच्या बाहेरील एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. 


टाटांनी इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोत ताज हॉटेलमधील एक कर्मचारी कुत्र्याच्या डोक्यावर छत्री धरुन उभा असल्याचं दिसतं. 'ताजचा हा कर्मचारी अतिशय दयाळू आहे. त्यानं आपली छत्री भटक्या कुत्र्यासोबत शेअर केली आहे. मुंबईचा पाऊस मुसळधार असूनही त्यानं प्राणीमित्राची दया दाखवली. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मनाला स्पर्श करून जाणारा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राण्यांप्रतीचा हा जिव्हाळा सदसर्वकाळ राहो,' असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. 

Read in English

Web Title: Ratan Tata's share emotional pic of rain in mumbai Taj Hotel staff, special photo shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app