बाईक टॅक्सी बंद करण्याची रॅपिडोला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:18 AM2020-11-04T02:18:52+5:302020-11-04T02:19:45+5:30

rapido bike taxi app : मुंबईत बाईक टॅक्सी  रॅपिडो कंपनीने सुरू केली होती. या बाईक टॅक्सीच्या प्रवासासाठी प्रवाशांना ६ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे मोजावे लागणार आहे.

Rapido notices to stop bike taxis | बाईक टॅक्सी बंद करण्याची रॅपिडोला नोटीस

बाईक टॅक्सी बंद करण्याची रॅपिडोला नोटीस

googlenewsNext

मुंबई : परिवहन विभागाने (आरटीओ) ॲप आधारित बाईक टॅक्सी रॅपिडोला नोटीस दिली असून तात्काळ सेवा बंद करण्यास सांगितल्याची माहिती मंगळवारी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत बाईक टॅक्सी  रॅपिडो कंपनीने सुरू केली होती. या बाईक टॅक्सीच्या प्रवासासाठी प्रवाशांना ६ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे मोजावे लागणार आहे. याबाबत अविनाश ढाकणे म्हणाले की, सध्या दुचाकीला सार्वजनिक प्रवासी वाहन म्हणून अद्याप मान्यता दिलेली नाही. अंधेरी आरटीओने कंपनीला सोमवारी नोटीस पाठविली आहे. रॅपिडोने सुरू केलेली बाईक टॅक्सी बेकायदेशीर आहे. राज्य सरकारची त्याला परवानगी नाही. तर, अंधेरी आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीला तात्काळ सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  कंपनीला नोटीस देऊन ७ दिवसांची मुदत दिली असून त्यांचे उत्तर न आल्यास पुढील कारवाई होईल. दरम्यान,  उबेरने बाईक टॅक्सी सुरू केल्याची माहिती मिळाल्यास त्या कंपनीलाही नोटीस देण्यात येईल असे आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Rapido notices to stop bike taxis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.