Join us  

राणीबागेतील २डी थिएटर रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:33 AM

महापालिका तोंडघशी : विविध परवानग्या मिळण्यापूर्वी केली घोषणा

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत २डी थिएटर दाखविण्याच्या घोषणेने बच्चेकंपनीमध्ये उत्सुकता निर्माण केली. मात्र, उत्सुकतेने प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे. कारण विविध परवानग्या मिळण्यापूर्वीच या उपक्रमाची घोषणा केल्यामुळे मुंबई महापालिका तोंडघशी पडली आहे.

राणीच्या बागेतील पेंग्विन कक्ष हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी काही देशी-विदेशी प्राणी आणण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, ‘वाइल्ड लाइफ चॅनल-अ‍ॅनिमल प्लॅनेट’तर्फे वन्यप्राणी आणि पर्यावरणविषयक माहितीपट दाखविण्याची घोषणा महापालिकेने जानेवारी महिन्यात केली. त्यानुसार, १ फेब्रुवारीपासून मुंबईकरांना२डी प्रणालीचे चार शो येणाºया पर्यटकांना दाखविण्यात येणार होते. मात्र, या प्रकल्पासाठी आवश्यक परवानगी अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे १ फेब्रुवारीचा मुहूर्त हुकला आहे.असा आहे प्रकल्प!या प्रकल्प अंतर्गत २डी प्रणालीचे एकूण चार माहितीपट सकाळी ११, १२.३०, दुपारी २.३० आणि सायंकाळी ४ वाजता दाखविण्यात येतील. शेवटचा शो हा सायंकाळी ५.०० वाजता संपेल. त्यांचा अवधी दररोज एक तासांचा असेल. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना हे शो नि:शुल्क पाहता येणार आहे.च्या थिएटरमध्ये ‘जवाई: इंडियास लेपर्ड हिल्स’, अफ्रिकन वाइल्ड, मिस्टिरियस वाइल्डस् आॅफ इंडिया, स्पीड आॅफ लाइफ या जागतिक दर्जाच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.च्प्राणिसंग्रहालयात दररोज सुमारे १५ हजारांहून अधिक शालेय विद्यार्थी पालकांसह येतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांहून अधिक असते. त्यामुळे या सिनेमागृहात सुमारे दोनशे आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.या परवानग्या प्रलंबितया थिएटरसाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांची परवानगी अशा विविध परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत. याबाबतची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरू आहे. मात्र, हे थिएटर कधीपर्यंत सुरू होणार याबाबत अद्याप प्रशासनालाही ठोस उत्तर देता आलेले नाही. याबाबत विचारले असता, काही परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.