Join us  

रंगसंगती कलामंचाकडून येत्या रविवारी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:34 PM

रंगसंगती कलामंच या संस्थेला अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे यंदा कोविड काळात त्यांनी सामाजिक भान ओळखून रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे.

मुंबई - रंगसंगती कलामंच मुंबई या संस्थेने त्यांच्या कलागुणांतून सामाजिक संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. यावर्षीही सामाजिक भान जपत केवळ त्यांच्या कलाकृतीतून नव्हे तर कृतीतून सामाजिक संदेश देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून त्यांनी ‘रक्तदान शिबीर’ आयोजित करण्याचं आणि यामध्ये सर्व सदस्यांनी सामील होऊन खऱ्या अर्थाने यावर्षीचा वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे.

या संस्थेने म्हटलं आहे की, इतकी वर्ष जसे सातत्याने रंगसंगतीच्या कलाकृतींना प्रतिसाद आणि पाठींबा दिलात तसाच प्रतिसाद तुम्ही या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून द्यावा असं सर्वांना आवाहन आहे. रंगसंगती कलामंच या उपक्रमाचं आयोजन सरकारने ठरवून दिलेल्या नियमांना अनुसरूनच करणार आहे. हा उपक्रम दिनांक १६-०५-२०२१ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, ६ वा माळा, सर्विस ब्लॉक बिल्डींग, परेल’. या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. सर्वांचा वेळ वाचावा आणि गर्दी टाळता यावी यासाठी आपण आपल्या वेळेनुसार अपॉइंटमेंट घेऊन रक्तदान करण्यासाठी येऊ शकता. लॉकडाऊन असल्या कारणाने त्या दिवशी प्रवास करण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलकडून पत्रक दिले जाईल आणि प्रत्येकाच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी आणि काळजी घेऊनच हा उपक्रम राबवला जाईल.असं या संस्थेचे अध्यक्ष रोहित खुडे यांनी आवर्जून सांगितले.

अपॉइंटमेंट संपर्क : चेतन                     : ८६५२५१९६६७प्रणाली                 : ९९८७६५४०३१प्रज्ञेश                     : ९६६४१२१९८७

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या