Join us  

मोफत सॅनिटरी नॅपकिनसाठी रणरागिणीचा ‘आवाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 3:19 AM

जास्त किंमत, उपलब्धता, उत्पादन, त्यावरील कर आणि महत्त्वाचे म्हणजे अंधश्रद्धा, अशा विविध कारणांमुळे, भारतात आजही कित्येक ठिकाणी महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत, परंतु लातूर येथील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करून, तब्बल ५ लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची सवय लावली आहे.

मुंबई : जास्त किंमत, उपलब्धता, उत्पादन, त्यावरील कर आणि महत्त्वाचे म्हणजे अंधश्रद्धा, अशा विविध कारणांमुळे, भारतात आजही कित्येक ठिकाणी महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत, परंतु लातूर येथील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करून, तब्बल ५ लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची सवय लावली आहे. ५ लाख महिलांपर्यंत मासिक पाळीच्या अगोदर रास्त दरात सॅनिटरी नॅपकिन पोहोचविण्याचे काम काकडे यांची संस्था करत आहे. सॅनिटरी नॅपकिन सर्व महिलांना मोफत, रेशनिंगच्या दुकानावर उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी त्या सद्यस्थितीमध्ये आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्या निमित्ताने ‘लोकमत व्यासपीठ’ या मुलाखत सदराखाली अक्षय चोरगे यांनी त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद.सॅनिटरी नॅपकिन मोफत का करायला हवे?- गावात, वाडीत मेडिकलचे दुकान, मार्केट, मॉल्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे गावांमध्ये राहणाºया महिलांना, तरुणींना सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी शहरात अथवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. २५ रुपयांचे पॅड खरेदी करण्यासाठी ५० रुपयांपेक्षा अधिक पैसे प्रवासखर्चाला लागतात. खेड्यात राहणाºया महिलेला, वेठबिगारी करणाºया, दिवसाला १०० ते २०० रुपये कमविणाºया महिलेला ही रक्कम परवडत नाही. अशा महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत करायला हवेत. आजही जवळजवळ २० टक्के महिला नवºयापासून लपून सॅनिटरी पॅड वापरतात.सॅनिटरी नॅपकिन पुरविण्यासाठी रेशनिंगचे दुकान का?- मेडिकल किंवा इतर मोठी दुकाने प्रत्येक गावात नसतात. मात्र, प्रत्येक गावात रेशनिंगचे दुकान असते. बहुसंख्य घरांमध्ये रेशनिंगच्या दुकानावर साहित्य खरेदीसाठी महिला जातात. त्यामुळे रेशनिंगच्या दुकानावरून नॅपकिन घेणे प्रत्येक महिलेला शक्य होईल. ही मागणी मांडण्यापूर्वी शेकडो तरुणींशी संवाद साधला, सर्वांनी रेशनिंग दुकानाचीच मागणी केली.तुमची संस्था सॅनिटरी नॅपकिनबाबत कोणती कामे करते?विचारधारा ग्रामीण विकास संस्था, आशिव या आमच्या संस्थेसोबत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमधील तब्बल ५०० महिला बचत गट जोडलेले आहेत. संस्था इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन करते. महिन्याला ५ लाख पॅड्सची निर्मिती केली जाते. पैकी ५ हजार पॅड दुबई आणि अमेरिकेतही पाठविले जातात. संस्थेमुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल १० हजार महिलांना रोजगार मिळाला असून, या महिला दर महिना सरासरी ५ हजार रुपये कमवितात.संस्थेचा मासिक पाळीबाबतचा सॉफ्टवेअर कसा आहे?संस्थेच्या आरोग्यदूतांनी तब्बल ५ लाख महिलांच्या मासिक पाळीबाबतची माहिती गोळा केली आहे. प्रत्येकीच्या मासिक पाळीची तारीख व आरोग्यविषयक समस्या(असतील तर) आणि औषधांबाबतची माहिती याच्या नोंदी ठेवल्या आहेत. त्याच्या आधारे संस्थेने सॉफ्टवेअर तयार केला आहे. सॉफ्टवेअरच्या साहाय्याने प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीबाबतची संपूर्ण माहिती आम्हाला एका क्षणात मिळते.- १९९३ साली सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी लातूर येथील किल्लारी या गावी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. मी तेव्हा १६ वर्षांची होते. मी बाबांच्या या शिबिरात सहभागी झाले. या शिबिरातून मला माझ्या या छोट्याशा कामाची प्रेरणा मिळाली.

टॅग्स :मुंबई