Join us  

रायगडच्या ‘जलपरी’चा ‘वॉटरपोलो’ला रामराम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 7:24 AM

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तब्बल ५० हून अधिक पदकांची कमाई करणाºया रायगड जिल्ह्यातील समीक्षा शिर्के या जलपरीने संघटनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून वॉटरपोलो या खेळाला कायमाचा रामराम ठोकला आहे. संघटनेचे काही पदाधिकारी पैसे

मुंबई : राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तब्बल ५० हून अधिक पदकांची कमाई करणाºया रायगड जिल्ह्यातील समीक्षा शिर्के या जलपरीने संघटनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून वॉटरपोलो या खेळाला कायमाचा रामराम ठोकला आहे. संघटनेचे काही पदाधिकारी पैसे घेऊन खेळाडूना संधी देतात. पैसे न दिल्यास चांगल्या खेळाडूंना डावलले जाते, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे अशा पदाधिकाºयांवर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा येथील समीक्षा शिर्के वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याच्या विविध स्पर्धेत सहभागी होत आहे. वयाच्या आठव्या वर्षी तिने उरण ते गेटवे आॅफ इंडिया हे सागरी अंतर ४ तास २ मिनिटांत पार केले होते. तर २००८ ला सिंधुदुर्ग जिल्हा स्पर्धेत तिने शेकडो जलतरणपटूंना मागे टाकतसिंधुदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी पटकावली होती.रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धांत तिने उत्कृष्ट कामगिरी केल्याने २०१३ला तिला रायगड भूषण पुरस्कार देण्यात आला. याशिवाय ३ राष्ट्रीय पुरस्कारांसह आत्तापर्यंत तिने २६ सुवर्णपदक, २० रौप्य आणि १२ कास्य पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तिची ओळख रायगडची जलपरी अशी झालेली आहे.गेल्या काही वर्षांपासून रायगडच्या संघातून ती वॉटरपोलोसाठी गोलकिपरची भूमिका बजावत आहे. मात्र ‘एमएसएएए’चे काही पदाधिकारी मनमानी करत असल्याने दोन वर्षांपासून राष्ट्रीय निवड चाचणीत भाग घेऊनही समीक्षाला खेळण्याची संधी दिली गेली नाही.काही पदाधिकाºयांकडून पैशांची मागणी केली जात असून पैसे न दिल्याने डावलले जात असल्याचा आरोप समीक्षाचे वडील दिनेश शिर्के यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्री आणि पंतप्रधानांना देखील पत्र पाठवले आहे.‘तिसºया किपरचीगरज नाही’असा काहीही प्रकार याठिकाणी नाही. आमच्या ग्रुपमध्ये दोन गोलकिपर सध्या आहेत. त्यामुळे तिसºया किपरची सध्या गरज नाही. सिलेक्शन कमिटीने तसा आम्हाला रिपोर्ट दिला आहे.- जुबेन अमारिया,सेक्रेटरी, एमएसएएए

टॅग्स :क्रीडा