Join us  

कोस्टल रोडचा पावसाळ्यापूर्वी ‘श्रीगणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:33 AM

सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा श्रीगणेशा या वर्षीच पावसाळ्यापूर्वी करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. मात्र, अशा प्रकारचा हा प्रकल्प पहिलाच असल्याने या कामासाठी चार सल्लागार नेमण्यात येणार आहेत.

मुंबई : सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा श्रीगणेशा या वर्षीच पावसाळ्यापूर्वी करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. मात्र, अशा प्रकारचा हा प्रकल्प पहिलाच असल्याने या कामासाठी चार सल्लागार नेमण्यात येणार आहेत. यापैकी साधारण सल्लागाराची नेमणूक गेल्या वर्षी करण्यात आली. त्यानंतर आता प्रकल्प व्यवस्थापनासाठी तीन सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. परंतु, आतापर्यंत फक्त दोन सल्लागारच निश्चित झाले आहेत. तिसऱ्या सल्लागारासाठी फेरनिविदा मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच उद्घाटनाचा मुहूर्त गाठण्यासाठी पालिका अधिकाºयांची धावपळ सुरू आहे.कोस्टल रोड या प्रकल्पासाठी देश-विदेशातील एकूण १७ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत १७ विविध परवानग्या घेण्यात आल्या आहेत. सल्लागार नियुक्त झाल्यानंतरच या प्रस्तावांची छाननी करून पावसाळ्यापूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ‘बार’ उडविण्यात येणार आहे. मात्र, प्रकल्प व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या तीनपैकी एका सल्लागारासाठी एकच निविदा आल्याने आता यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात येणार आहेत. अंदाजे ८ हजार कोटींच्या या प्रकल्पाचे काम सर्वांत कमी बोली लावणाºया कंपनीला मिळणार आहे.या १७ कंपन्यांमध्ये चीन, इटली, कोरिया, गल्फ अशा देशांतील कंपन्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या कंपन्यांना संधी देण्याआधी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक ठरते. केंद्रीय गृह मंत्रालयाने बाद केलेल्या परदेशी कंपनीचे निविदा पत्र उघडण्यात येणार नाही. ज्यामुळे ती निविदा आपोआपच बाद ठरणार आहे. आतापर्यंत वन विभाग, पर्यावरण, मेरी टाइम बोर्ड अशा केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्या पालिकेने मिळवल्या आहेत. त्यामुळे मरिन ड्राइव्ह ते कांदिवली या सागरी मार्गाचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.कोट्यवधीचा ‘सल्ला’प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, रेखाचित्रे, कामावर देखरेख अशा विविध कामांसाठी तीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे.यापैकी प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम पाहणाºया मे. ल्युस बर्नर कन्सल्टन्सी कंपनी लि.ला ५० कोटी ५२ लाख ८० हजार रुपये शुल्कापोटी देण्यात येणार आहेत, तर बडोदा पॅलेस ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिणेकडील टोकापर्यंतच्या कामाचा मोबदला म्हणून ५७ कोटी ६१ लाख ६० हजार रुपये देण्यात येणार आहेत.वाहतूककोंडीफुटणारया प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. चौपाटी येथून निघालेला हा बोगदा थेट प्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. त्यामुळे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होणार नाही. तिथून हा प्रकल्प वांद्रे सागरी सेतू ते गोराई असा प्रवास करेल. या प्रकल्पासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातून उपनगरात जाण्यास सध्या लागत असलेला दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे.अशी झाली प्रकल्पाची सुरुवात२०११मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरिमन पॉइंट ते वर्सोवापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प व्यवहार्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. मात्र मच्छीमारांचा विरोध, पर्यावरणवादी संस्थांचा आक्षेप अशा विविध अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला. राज्यात सत्तांतरानंतर या प्रकल्पाची लगाम भाजपाच्या हातात गेली. महापालिकेच्या निवडणुकीत या प्रकल्पाच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजपामध्ये चढाओढ सुरू होती.अशाही काही सुविधाकोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी वाहनतळाचीही सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.रस्त्याचे स्वरूप असे -- नरिमन पॉइंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. सागरी मार्ग- पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंक हे ९.९८ किमीचे काम २०१९पर्यंत करण्यात येणार आहे.- त्यानंतर वांद्रे सी-लिंक ते कांदिवली या दुसºया टप्प्याचे काम करण्यात येणार आहे.- किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे.- या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ हजार ३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येईल.- कोस्टल रोडवर रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणेतीन मीटर रुंदीची असेल. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्यांचा मार्ग खुला होणार आहे.

टॅग्स :मुंबई