Join us  

पुन्हा पाऊस; आजपासून चार दिवस कोसळधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, २ ते ५ ऑगस्टदरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या किनारी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीवरही पोहोचेल. गोवा आणि गुजरात किनारीही वेगाने वारे वाहणार असून, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनारी चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील. याच काळात महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधारा कोसळतील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. या काळात मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ३ ऑगस्ट रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ४ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ ऑगस्ट रोजी रायगड आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईत याच काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.