सर्वांसाठी रेल्वे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात? गर्दी रोखण्याचे सरकारसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:38 AM2020-12-26T05:38:34+5:302020-12-26T06:48:24+5:30

Mumbai Local : सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरून लोकल सुरू होतील. मात्र, प्रश्न गर्दीचा आहे.

Railways for all in the first week of January? | सर्वांसाठी रेल्वे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात? गर्दी रोखण्याचे सरकारसमोर आव्हान

सर्वांसाठी रेल्वे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात? गर्दी रोखण्याचे सरकारसमोर आव्हान

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. जानेवारी पहिल्या आठवड्यात ती सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, गर्दी रोखण्याचे सरकारसमोर आव्हान असणार आहे.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियमित रेल्वेफेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या राेज ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. रेल्वेची पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरून लोकल सुरू होतील. मात्र, प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. 
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे, मात्र सर्वांसाठी रेल्वे सुरू केल्यास गर्दीतून 
कोरोना संसर्गाचा अधिक प्रसार होऊ शकतो, त्यामुळे त्याचाही विचार 
व्हावा.
नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेक संबंधितांसाेबत चर्चाही करत आहेत, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Web Title: Railways for all in the first week of January?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.