Join us  

रुळावरील ‘सेंसर’ रोखणार रेल्वे अपघात; राजधानीपासून मालगाडीपर्यंत सर्व ट्रेनची ‘आॅनलाइन’ पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 2:15 AM

रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसचे वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे आॅनलाइन पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅस्ट्रेलियन ‘आॅनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक’ (ओएमआरएस) या तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पाहणी होणार आहे.

- महेश चेमटेमुंबई : रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसचे वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे आॅनलाइन पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅस्ट्रेलियन ‘आॅनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक’ (ओएमआरएस) या तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पाहणी होणार आहे. राज्यात मध्य रेल्वेवरील नागपूर-वर्धा, भुसावळ-जळगाव आणि पश्चिम रेल्वेवरील सूरत-वडोदरासह, देशभरातील २५ विभागांत ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.रेल्वे रुळावरील लोको, बोगी आणि मालगाडी यांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी, ‘आॅनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक’ यंत्रणा कार्यरत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यानुसार, रेल्वे रुळालगत सेंसर आणि मायक्रोफोन बसविण्यात येतील. सेंसर आणि मायक्रोफोनच्या मदतीने चाकातील विशिष्ट आवाजाची आॅनलाइन चाचपणी करण्यात येईल.अयोग्य आवाज आल्यास, त्याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात येईल. त्याचबरोबर, आवाजाच्या विविध लहरी सेंसरमार्फत नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचण्याकरिता अलार्मची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. रिसर्च डिझाइन अँड स्पेसिफिकेशन आॅर्गनायझेशनने मान्यता व प्रमाणित केलेली ही यंत्रणा आहे.सुयोग्य स्थितीत असताना, बोगी, लोको आणि मालगाडी यांचे विशेष आवाजाचे नियंत्रण कक्षात संगणकीकरणातून जतन केले जाते. बिघाडासारखा अयोग्य आवाज आल्यास, एसएमएस अलर्टदेखील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील मध्य आणि पश्चिम विभागासह देशभरातील एकूण २५ ठिकाणी ही यंत्रणा लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे.११३ कोटींचा खर्चरेल्वे बोर्डाच्या निवडक अधिकाºयांनी देशातील सर्व रेल्वे विभागाची पाहणी केली. या पाहणीनुसार देशभरात एकूण ६५ विभागांत ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यापैकी २५ विभागांत ही यंत्रणा उभारण्यासाठी ११३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात यंत्रणा कार्यान्वित केल्यापासून आगामी पाच वर्षांच्या देखभाल खर्चाचादेखील समावेश आहे.- मालगाडी ते राजधानीपर्यंतच्या सर्व ट्रेनची आॅनलाइन पाहणी करण्याची यंत्रणा, अंबाला विभागातील दिल्ली पानिपत मार्गादरम्यान कार्यरत आहे.- याचा फायदा राजधानी आणि मालगाडी यांना होणार असल्याची माहिती, उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन चौधरी यांनी दिली.२५ ठिकाणी यंत्रणा उभारणारमालगाडी ते राजधानीपर्यंतच्या सर्व ट्रेनची आॅनलाइन पाहणी करण्याची यंत्रणा, अंबाला विभागातील दिल्ली पानिपत मार्गादरम्यान कार्यरत आहे. दीड वर्षांच्या आत देशातील २५ ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील वर्धा- नागपूर, भुसावळ-जळगाव यांचा समावेश आहे.- अरुण अरोरा, प्रमुख व मुख्य यांत्रिक अभियंता, उत्तर रेल्वे.

टॅग्स :भारतीय रेल्वे