Join us  

छात्रभारतीच्या संमेलनात राडा, पोलिसांनी परवानगी नाकारली; जिग्नेश, उमरची भाषणे रोखली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:46 AM

छात्रभारती आयोजित राष्ट्रीय छात्र संमेलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गुरुवारी विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या भाईदास सभागृहाबाहेर चांगलाच राडा झाला. मुंबईत कलम १४४ लागू असल्याचे सांगत पोलिसांनी या ठिकाणी होणा-या गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी नेते उमर खालीद यांच्या भाषणांना विरोध केला.

मुंबई - छात्रभारती आयोजित राष्ट्रीय छात्र संमेलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गुरुवारी विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या भाईदास सभागृहाबाहेर चांगलाच राडा झाला. मुंबईत कलम १४४ लागू असल्याचे सांगत पोलिसांनी या ठिकाणी होणा-या गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी नेते उमर खालीद यांच्या भाषणांना विरोध केला. मात्र कोणत्याही परिस्थितीत संमेलन होणारच या भूमिकेवर छात्रभारतीचे पदाधिकारी ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धरपकड केली.छात्रभारतीने गुरुवारी या ठिकाणी राष्ट्रीय छात्र संमेलनाचे आयोजन केले होते. मात्र बुधवारी महाराष्ट्र बंदमुळे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सकाळी ९च्या सुमारास पोलिसांनी भाईदास सभागृहाबाहेर मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणी जमलेले शेकडो विद्यार्थी आणि त्यांना रोखण्यासाठी तैनात शेकडो पोलिसांमुळे विभागाला पोलीस छावणीचे रूप आले होते.दरम्यान, संमेलनात प्रक्षोभक भाषणे होण्याची शंका व्यक्त करत पोलिसांनी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास छात्रभारतीला मज्जाव केला. मात्र कार्यक्रमाच्या काही वेळ आधी सांगून कार्यक्रम रद्द करता येणार नसल्याचे सांगत छात्रभारती संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमावर ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांसह प्रमुख पदाधिकाºयांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या वेळी पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप करत छात्रभारतीच्या पदाधिकाºयांनी जोरदार घोषणाबाजीस सुरुवात केली. परिणामी, परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी आमदार कपिल पाटील, पे्रसिडेंट अलाहाबाद युनिव्हर्सिटी युथ विंगच्या रिचा सिंग, छात्रभारती अध्यक्ष दत्ता ढगे, बेदाब्रता गोगई, प्रदीप नरवाल या सर्वच नेत्यांना जुहू पोलिसांनी ताब्यात घेत जमावाला पांगवले.राष्ट्रीय संमेलन झाले नसले तरी १० जानेवारी रोजी हेच संमेलन आॅनलाइन करणार आहोत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. येत्या काळात मोठे आंदोलन उभे क्न३. यासाठी विरोधी पक्षाचा पाठिंबा घेऊ. तसेच नागपूरचे वर्चस्व उधळून लावायचे आहे. पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद येथे शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काही दिवसांत सभा घेतलीजाईल, अशी माहिती आमदार कपिल पाटील यांनी दिली.पोलिसांची दडपशाही!मेवाणी आणि खालीद यांच्याशिवाय आम्ही कार्यक्रम करायला तयार असून महाराष्ट्र बंद घटनेचा आणि छात्रभारती कार्यक्रमाचा काहीच संबंध नसल्याचे आम्ही पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी काहीही न ऐकता आम्हाला पोलीस ठाण्यात डांबले. ही दडपशाही आहे.- सचिन बनसोडे, सहनिमंत्रकविद्यार्थ्यांची भीती!आणीबाणीचा काळ सुरू आहे. हा मुद्दा आम्ही संसदेपर्यंत घेऊन जाणार. देशात तानाशाही सुरू आहे. सरकारला जास्त भीती विद्यार्थ्यांकडून आहे, त्यामुळे ते घाबरत आहेत.- रिचा सिंग, प्रेसिडेंट,अलाहाबाद युनिव्हर्सिटी युथ विंगसरकारचा निषेधछात्रभारतीचे विद्यार्थी एकत्र येऊन चांगला कार्यक्रम करत असतील, तर त्यांना तुम्ही परवानगी नाकारता. सरकार दडपशाही आणि पोलिसांचा वापर करू लागले आहे, त्याचा मी निषेध करतो.- कपिल पाटील, आमदारही तर हुकूमशाही!विद्यार्थ्यांना आणि आमदार कपिल पाटील यांना पोलिसांनी का ताब्यात घेतले? संभाजी भिडे आणि मनोहर एकबोटे यांना का अटक केली जात नाही? भाजपाचे सरकार हुकूमशाही करत आहे.- विद्या चव्हाण, आमदार

टॅग्स :जिग्नेश मेवानीछात्रभारतीमुंबई