Join us  

विद्यावेतनाचा प्रश्न आज सुटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:44 AM

‘एमबीबीएस’च्या पदवीनंतर एक वर्ष इंटर्नशिप करणाऱ्या राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे विद्यावेतन (स्टायपेंड) वाढवून देण्याची मागणी पूर्ण न केल्याने, राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

मुंबई : ‘एमबीबीएस’च्या पदवीनंतर एक वर्ष इंटर्नशिप करणाऱ्या राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे विद्यावेतन (स्टायपेंड) वाढवून देण्याची मागणी पूर्ण न केल्याने, राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. याविषयी शनिवारी नागपूरमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बैठक होणार असून, त्यानंतर हा प्रश्नसुटणार आहे, अशी माहिती असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तिसºया दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच होता.महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सहा हजार रुपये दरमहा म्हणजेच दोनशे रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून विद्यावेतन वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याकरिता नजीकच्या राज्यांचा हवालाही देण्यात आला. केरळ, आसाम, ओडिशा, छत्तीसगड येथे प्रत्येकी २० हजार रुपये, गुजरातमध्ये १० हजार ७०० रुपये, आंध्र प्रदेश, तेलंगणात ११ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. त्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कमी विद्यावेतन मिळत असल्याची तक्रार, ‘असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स’च्या (अस्मी) प्रतिनिधींनी वेळोवेळी राज्य सरकारकडे केली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली. येत्या १५ दिवसांत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. आश्वासन देऊन सव्वा महिना उलटला, तरीही अद्याप विद्यावेतनाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे राज्यभरातील सरकारी मेडिकल कॉलेजच्या ‘अस्मी’च्या डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संदर्भात महाजन यांना निवेदनही देण्यात आले आहे.मुंबईत फारसा परिणाम नाहीप्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विद्यावेतनाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. शहर-उपनगरातील रुग्णसेवेवर थेट परिणाम दिसला नसला तरीही रुग्णसेवा ढासळत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील प्रमुख रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत सुरू होती.सरकारकडून गेल्या चार वर्षांपासून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या पगार वाढीबाबत टोलवाटोलवी सुरू आहे. २ मे रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि अर्थ विभागाच्या पदाधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत तातडीने विद्या वेतनवाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले.आता मात्र सरकारने त्वरीत निर्णय घेतला नाही .त्यावर कोणत्याही प्रकारची कायर्वाही झाली नसल्याने कामबंदचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :डॉक्टरबातम्या