घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 04:48 AM2020-03-20T04:48:09+5:302020-03-20T04:48:42+5:30

मुळात घरकाम करणा-या महिला या असंघटित आहेत. त्यांना इतर नोकरदार वर्गाप्रमाणे कोणत्याही सुविधा किंवा आस्थापनाकडून मिळणारे फायदे, एकरकमी महिन्याचा ठरलेला पगार उपलब्ध नसतो.

The question of the dependence of the family on the homework of the working women | घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

googlenewsNext

मुंबई : घरगुती अडचणी आणि आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक महिला इतरांच्या घरी जेवण बनविण्याचे, धुण्या-भांड्याचे काम करतात. पण दोन दिवसांपूर्वी मुंबईतील घरकाम करणा-या महिलेचा आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टचा धसका या घरकाम करणा-या महिलांनीही घेतला आहे. तर दुसरीकडे काही नागरिकांनी या महिलांना काही दिवस कामावर येऊ नका, असे सांगितले असून आता या महिलांनी नेमके काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मुळात घरकाम करणा-या महिला या असंघटित आहेत. त्यांना इतर नोकरदार वर्गाप्रमाणे कोणत्याही सुविधा किंवा आस्थापनाकडून मिळणारे फायदे, एकरकमी महिन्याचा ठरलेला पगार उपलब्ध नसतो. त्यातच काही महिला तर लांबचा पल्ला गाठून जेवण बनविण्यासाठी किंवा घरकामासाठी येत असतात. प्रवासादरम्यान किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची व्यवस्था या सगळ्यांचा विचार करता कोरोनाचा संसर्ग संभवू शकतो. या पार्श्वभूमीवर काही लोकांनी त्यांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान आपले घर कसे चालणार, उदरनिर्वाह कसा होणार, असा प्रश्न या महिलांना पडला आहे. त्यांच्या बाबतीत सरकारनेही निर्णय घ्यावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चारकोप येथे राहणा-या नसीम खान यांनी आपल्या घरी घरकाम करणाºया महिलेची सेवा बंद केली असली तरी ते तिला पूर्ण महिन्याचा पगार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर श्वेता काळे यांनी आपल्या घरी दोन वेळा येणाºया महिलेला आता एकाच वेळी येण्यास संगितले आहे. त्यांच्यासाठी वेगळे हँडग्लोव्हज् आणि सॅनिटायझरही उपलब्ध करून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या महिलांनाही आपल्या आरोग्याची काळजी आहेच, त्यामुळे एक दिवसाआड काम, सलग सात दिवस किंवा ३१ मार्चपर्यंत सुट्टी असे पर्याय अनेकांनी सुचविले. मात्र अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने ही सरसकट मागणी करता येत नसल्याची खंत घरकाम करणाºया महिला संघटनेच्या सुरेंद्र बनसोड यांनी व्यक्त केली.

आमच्यासाठी काहीतरी पावले उचला!
आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी या काळात तरी सरकारने काहीतरी पावले उचलायला हवीत. सगळेच आम्हाला भरपगारी रजा देत नाहीत, मग आम्ही यादरम्यान काय करायचे, आम्हाला आमच्या कुटुंबीयांसाठी घराबाहेर पडावेच लागते. सरकारकडून काही तरतूद झाल्यास मदत होईल, असे मत शिल्पा मदने या घरकाम करणाºया महिलेने व्यक्त केले आहे.

Web Title: The question of the dependence of the family on the homework of the working women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.