Join us  

मागणी वाढल्याने आणखी कचरापेट्यांची खरेदी , पालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:00 AM

मुंबई महापालिका प्रशासनाने ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे केले खरे. मात्र, अद्यापही मुंबईतील बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्यांना ओला व सुका कच-याच्या स्वतंत्र पेट्या पुरविण्यात आलेल्या नाहीत.

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे केले खरे. मात्र, अद्यापही मुंबईतील बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्यांना ओला व सुका कच-याच्या स्वतंत्र पेट्या पुरविण्यात आलेल्या नाहीत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडेही अशा कचरापेट्यांचा तुटवडा असल्याने, या मोहिमेलाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मागणीनुसार, १० लीटर क्षमतेच्या दहा लाख कचरापेट्या, तर १२० लीटर क्षमतेच्या ५० हजार कचरापेट्या खरेदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.कचºयाची समस्या बिकट झाल्यामुळे, मुंबईत दररोज जमा होणाºया कचºयाचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार, ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले. ओल्या कचºयावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया, तर सुका कचरा पालिका वाहून नेणार असे ठरले.मात्र, हा कचरा मुंबईतील घराघरात वेगळा ठेवण्यात आला, तरी पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर एकत्रित जात होता. यावर टीकेची झोड उठल्यानंतर पालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी बंदिस्त कचरापेट्यांची खरेदी केली, तरीही नगरसेवक निधीतून खरेदी करण्यात येणाºया या कचरापेट्यांची मागणी होत आहे.त्यानुसार, १० लीटर क्षमतेच्या १० लाख बंदिस्त कचरापेट्यांची आवश्यकता असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. १२० लीटर क्षमतेच्या सुमारे ५० हजार बंधिस्त कचरापेट्यांची मागणी आहे. या कंत्राटाचा कालावधी दोन वर्षांचा असल्याने, २०१८ ते २०२० पर्यंत या कचरापेट्यांच्या खरेदीची आर्थिक तरतूद पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. १० लीटरच्या क्षमतेच्या कचरापेटींसाठी ९ कोटी ३४ लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, तर १२० लीटर क्षमतेच्या कचरापेट्यांसाठी ६ कोटी ८४ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.ओला कचराशिळं अन्न,भाज्या-फळांची सालं,दुर्गंधीयुक्त अन्न,चहाचा गाळ,अंड्याची टरफले,मासे-कोंबडीची हाडे,केस, नखे,सॅनेटरी पॅड्स,ओला कागद,झाडाच्या फांद्या, पाने, फुले, हार, गवत इत्यादी .सुका कचराप्लास्टीकच्या वस्तू (डबे, पिशव्या, बाटल्या...),दूध- दह्याची पाकिटे,पिझ्झा, मिठाईचे बॉक्सेस,डिस्पोजेबल सामान (कप, ग्लासेस, प्लेट)पेपर, वर्तमानपत्र,वह्या, निमंत्रणपत्रिका,तुटलेला पत्रा,काचेचे सामान,इलेक्ट्रीक वस्तू, वायर, बॅटरीज, सर्व प्रकारचे धातू

टॅग्स :मुंबई महानगरपालिका