Join us  

भाजपा आमदार नरेंद्र मेहतांविरोधात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:10 PM

क्रारदारांना भाजपाने पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यामागे भ्रष्टाचार दडपण्याचा हा नाव फंडा  सुरु केल्याचा आरोप मीरा भाईंदर संघर्ष मोर्चाचे मिलन म्हात्रे यांनी केला आहे.

ठळक मुद्देक्रारदारांना भाजपाने पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यामागे भ्रष्टाचार दडपण्याचा हा नाव फंडा  सुरु केल्याचा आरोप मीरा भाईंदर संघर्ष मोर्चाचे मिलन म्हात्रे यांनी केला आहे. भाजपाचा भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार आहे का? तक्रारदारमुक्त अजेंडा आहे? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावं, असं आवाहन म्हात्रे यांनी केलं आहे. 

मीरारोड, दि. 17- मीरा भाईंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरोधात ज्यांनी भ्रष्टाचार, घोटाळयांच्या तक्रारी, जनहित याचिका केली आहे त्याच तक्रारदारांना भाजपाने पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यामागे भ्रष्टाचार दडपण्याचा हा नाव फंडा  सुरु केल्याचा आरोप मीरा भाईंदर संघर्ष मोर्चाचे मिलन म्हात्रे यांनी केला आहे. हा भाजपाचा भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार आहे का? तक्रारदारमुक्त अजेंडा आहे? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावं, असं आवाहन म्हात्रे यांनी केलं आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची रणधूमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं आहे. भाजपाने पालिका निवडणुकीत प्रभाग ११ मधुन स्वप्नाली संजय साळवी यांना उमेदवारी दिली आहे. साळवी या नुकत्याच पक्षात आल्या असून त्यांचे पती संजय यांनी केबलव्यवसायाच्या वादातून नरेंद्र मेहतां विरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. 

आणखी वाचा

उगीच ‘ध’चा ‘मा’ करू नका - अशोक चव्हाण

मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपाचे प्रभाग ७ मधील उमेदवार रवी व्यास यांनी आमदार मेहतांशी संबंधित सेव्हन स्कवेअर शाळेबाबत तक्रार केली होती. शहरासाठीच्या एकमेव टेक्निकल शाळेच्या आरक्षणात बेकायदा सीबीएससी बोर्डाची शाळा सुरु करुन शहरातील मुलांना टेक्निकल शिक्षणापासून वंचीत ठेवल्याने कारवाईची तक्रार व्यास यांनी केली होती. २०१२ च्या निवडणुकीतदेखील व्यास यांनी भाईंदर पोलिसात मेहतां विरुध्द तक्रार दिली. परंतु पुढे व्यास यांना भाजपात घेऊन दोन वेळा सभापती पद दिलेच, या शिवाय यंदा त्यांच्यासह व्यास यांचे समर्थक दरोगा पांडे यांनादेखील उमेदवारी दिली. 

प्रभाग ८ मधुन भाजपात नव्यानेच आलेल्या दिपाली मनोज कापडीया यांना उमेदवारी दिली. दिपाली यांचे पती मनोज यांनी मेहता महापौर असताना बेनामी संपत्ती प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शिवाय ओपन लँड टॅक्ससह इतर प्रकरणी देखील तक्रारी केल्या होत्या. 

भाजपाच्या प्रभाग १८ मधील उमेदवार निला सोन्स यांनी तर त्यांच्या मुलासंदर्भात अन्याय झाल्या बद्दल सेव्हन सक्वेअर शाळे विरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. साजी पापाचन उर्फ साजी आयपी यांनी तर मेहतां विरोधात तक्रारींची जंत्रीच लावली होती. साजी यांनी टेक्निकल शाळेचे आरक्षण बळकावणे . शाळा व सी एन रॉक या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम. हॉटेलसाठी कांदळवनाचा रहास करुन सरकारी व खाजगी जागेत बेकायदा रस्ता बांधणे तसेच निवडणुकीत सीडीद्वारे जातीय तेढ निर्माण करण्याबद्दल तक्रारी व दाखल गुन्हे, पोलिस संरक्षण काढुन घेण्याची मागणी आदी साजी यांनी केल्या होत्या. अनधिकृत बांधकाम प्रकरणी मेहतांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार पण त्यांनी केली होती . गंभीर बाब म्हणजे मेहतांच्या टीडीआर सह बेनामी संपत्ती प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. लोकायुक्तांनीदेखील साजी यांच्या तक्रारी वरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. टेक्निकल शाळेच्या आरक्षणात सीबीएससी बोर्डाची शाळा बेकायदा सुरु केल्या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. मेहतांच्या मागे तक्रारींची जंत्री लावणाऱ्या साजी आयपी यांना प्रभाग 19 मधुन भाजपाने उमेदवारी दिली आहे, असे मिलन म्हात्रे यांनी आपल्याकडील तक्रारींचे कागदोपत्री पुरावेच दाखवत सांगितलं. भाजपाचे आमदार मेहतां विरुध्द गंभीर स्वरुपाच्या तक्रारी करणाऱ्या या तक्रारदारांना वा त्यांच्या पत्नी, सहकाऱ्यांना निवडणुकीत उमेदवारी देऊन तक्रारदार मुक्त मीरा भाईंदर करण्याचा नविन नारा भाजपाने दिल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे. उमेदवारी देण्यापर्यंत ही तडजोड झाली ? का आणखी काही ? याचा खुलासा पारदर्शतका व भ्रष्टाचार मुक्ततेच्या बाता मारणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा भाईंदरच नव्हे तर राज्यातील जनते कडे करावा असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे. आम्ही फक्त इच्छुकांची नावं पाठवली होती. उमेदवारी ही पक्षाच्या पार्लामेंटरी बोर्डाने दिली आहे. त्या फक्त तक्रारी होत्या व पुर्वीच्या होत्या. त्यामुळे असले आरोप किंवा आव्हानांना काही अर्थ नाही. हेमंत म्हात्रे ( जिल्हाध्यक्ष, भाजपा )