Join us  

सार्वजनिक गणेशोत्सव - नवी आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:09 AM

मुंबई - लोकमान्य सेवा संघ पारले या सामाजिक संस्थेचा यंदा १०२ वा गणेशोत्सव असून, सद्यपरिस्थितीत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन ...

मुंबई - लोकमान्य सेवा संघ पारले या सामाजिक संस्थेचा यंदा १०२ वा गणेशोत्सव असून, सद्यपरिस्थितीत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन सादर होत आहेत. मुंबईतील पहिल्या-वहिल्या गणेशोत्सवाला म्हणजेच गिरगावातील केशव नाईक चाळीच्या गणेशोत्सवाला १२९ वर्षे झाली. या उत्सवाचा स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्थित्यंतरे झाली. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सुरक्षेची समीकरणे पार बदलली. तरी कुठल्याही परिस्थितीत उत्सवात खंड पडू न देता परंपरा अबाधित ठेवण्यात अनेक आव्हाने आली आणि पुढेही येतील. त्यातूनही मार्ग काढत चाळीतील अनेक मागील पिढ्यांनी पुढील पिढीकडे उत्सवाची धुरा सोपवली.

या प्रदीर्घ काळात सोसावी लागलेली दुःखे-संकटे, आलेले बरे-वाईट अनुभव, उपभोगलेले आनंदाचे-गौरवाचे क्षण आणि नवी आव्हाने या विषयावर संवाद साधणार आहेत. केशवजी नाईक चाळीच्या गणेशोत्सवाचे आजी आणि माजी कार्यकर्ते व पदाधिकारी. संवादक आहेत कार्यवाह डॉ. रश्मी फडणवीस आणि महेश काळे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शक आणि उपयुक्त असा हा मुलाखतीचा कार्यक्रम बुधवार, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.