Join us  

एपिलेप्सी आणि अवयवदानाविषयी रुग्णांकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:51 PM

मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी विविध सामाजिक, पर्यावरण आणि आरोग्यविषयक विषयांवर प्रकाशझोत टाकत संदेश दिले जातात.

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी विविध सामाजिक, पर्यावरण आणि आरोग्यविषयक विषयांवर प्रकाशझोत टाकत संदेश दिले जातात. यंदाही विविध संदेशांसह अनेक संस्था आणि व्यक्तींनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन मुंबईकरांचे लक्ष वेधले. त्यात एपिलेप्सी आणि अवयवदान विषयांवर लक्ष देत संस्थांनी जनजागृतीपर मोहीम राबविली.गेल्या नऊ वर्षांपासून एपिलेप्सी फाउंडेशनकडून मॅरेथॉनमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जातात. यंदाच्या फाउंडेशनमार्फत जवळपास २५० रुग्णांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता, याशिवाय ४०० रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या रुग्णांना प्रोत्साहन दिले.>अवयदानाविषयी जनजागृतीअवयवदानाची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी अपेक्स किडनी फाउंडेशन आणि मानवता असोसिएसन यांनी पुढाकार घेतला होता. अवयवदानासंदर्भात पथनाट्य सादर करत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ‘महादान’ असे या पथनाट्याचे असून, नाट्याद्वारे अवयवदानाबाबत जागरूक करण्यात आले. गैरसमज दूर करून, अवयवदानाची सध्या किती गरज आहे, याची माहिती देण्यात आली.>पुरुषांच्या अधिकारांसाठी ‘वास्तव’ दौडमॅरेथॉनमध्ये वास्तव फाउंडेशनचे सदस्य सहभागी होऊन पुरुषांच्या हक्क व अधिकारांसाठी धावले. या माध्यमातून गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या पुरुष हक्क आयोगाची मागणी पुन्हा करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या सदस्यांनी विविध क्षेत्रांतील पुरुषांचे पोशाख परिधान केले होते, त्यात कुणी पोलीस, शेतकरी, कोळी, वकील होऊन प्रलंबित मागण्यांचे साकडे घातले़

टॅग्स :मुंबई मॅरेथॉन