Join us  

सोसायट्यांच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 7:16 AM

ओल्या कच-यावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने वारंवार मुदत देऊनही अद्याप केवळ एक हजार सोसायट्यांनीच त्यावर अंमल केला आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे २ हजार ३०० सोसायट्यांना एका महिन्याचीशेवटची संधी देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र सरसकट सर्वांवर कारवाई होणार आहे.

मुंबई - ओल्या कच-यावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने वारंवार मुदत देऊनही अद्याप केवळ एक हजार सोसायट्यांनीच त्यावर अंमल केला आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे २ हजार ३०० सोसायट्यांना एका महिन्याचीशेवटची संधी देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र सरसकट सर्वांवर कारवाई होणार आहे.मुंबईत वाढणाºया कचºयाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारातच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. मुंबईतील २० हजार चौ.मी.पेक्षा अधिक आकाराच्या व दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाºया सोसायट्यांचा कचरा २ आॅक्टोबर २०१६ पासून उचलणार नाही, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, यानिर्णयाला राजकीय नेते व नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर कारवाई मंदावली होती.विविध कलमांतर्गत कारवाईचा धाक, पाणी व वीजपुरवठा बंद करण्याची ताकीद, अशा नोटिसांमुळे गेल्या वर्षभरात तब्बल एक हजारगृहनिर्माण सोसायट्यांनी यावर अंमल केला. उर्वरीत २ हजार ३०० सोसायट्यांना महिन्याभराची मुदत देण्यात आली असल्याचे सूत्रांकडूनसमजते. याबाबत आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत आढावाही घेतला.कचरा कमी झाला२०१५ मध्ये दररोज सरासरी नऊहजार ५०० मेट्रिक टन एवढा कचरामुंबईतून उचलण्यात येत होता.महापालिकेने कचरा कमीकरण्यासाठी राबविलेल्याउपाययोजनांमुळे या कचºयाचे प्रमाणआता दररोज सरासरी सात हजार२०० मेट्रिक टनापर्यंत कमी झालेआहे. याचाच अर्थ दररोज सरासरीदोन हजार ३०० मेट्रिक टन एवढी घटकचरा संकलनात झाली आहे.मुंबई महापालिका अधिनियम, कलम ३६८ नुसारकरण्यात आलेली कारवाई : ३ हजार २८३ सोसायट्या,आस्थापनांना नोटिसी देण्यात आल्या. यापैकी १ हजार२६८ सोसायट्या/आस्थापनांकडून मुदत वाढविण्यासाठीअर्ज प्राप्त झाले. ८१८ सोसायट्या, आस्थापना यांनीअपेक्षित कार्यवाही पूर्ण केली, तर ७५४ च्या विरोधातकायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.वाहनसंख्येत घट : कचरा संकलनात घट झाल्यामुळे कचरा वाहूननेणाºया वाहनांची संख्या जून २०१७च्या तुलनेत फेब्रुवारी२०१८ मध्ये १२० वाहनांनी कमी झाली आहे. ही संख्या मे२०१८ पर्यंत आणखी ८० वाहनांनी कमी होणेअपेक्षित आहे. त्यानुसार सध्या ही संख्या शहरात७३३, पश्चिम उपनगरात ८५८ आणि पूर्वउपनगरात ५२७ याप्रमाणे एकूण दोन हजार११८ अशी आहे.पाच हजारांपर्यंत दंडमुंबई महापालिका अधिनियमकलम-३६८ नुसार कचराव्यवस्थापनाकडे दुर्लक्षकरणाºया सोसायट्यांना इतरकारवाईबरोबरच अडीचहजारांपासून पाच हजारांपर्यंत दंडकरण्यात येणार आहे.पर्यावरण संरक्षणकायद्यांतर्गत कारवाई२२४ सोसायट्या, आस्थापनांनानोटीस, २८ सोसायट्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रियासुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई