Join us  

२ हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:13 AM

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डसह दोन खासगी कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील तब्बल दोन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करता येणार आहे.

मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डसह दोन खासगी कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील तब्बल दोन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करता येणार आहे. या उपक्रमात या दोन्ही कंपन्या निरुपयोगी प्लॅस्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करणार आहेत.मजबूत भविष्यासाठी पर्यावरण सुरक्षेशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याची माहिती डाबर कंपनीचे संचालन विभागाचे कार्यकारी निर्देशक शारुख खान यांनी दिली. खान म्हणाले की, येत्या आर्थिक वर्षातदोन मेट्रिक टन प्लॅस्टिकचा कचरा राज्यभरातून गोळा करण्यात येणार आहे. गोळा करण्यात आलेल्या या प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाईल. हा कचरा गोळा करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही केली जाईल. प्लॅस्टिक कचºयापासून ऊर्जा आणि इंधन तयार केले जाईल. यातील इंधन सिमेंटच्या भट्टीत प्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी