Join us  

खोतवाडी-भीमवाडा एसआरए प्रकरणी चौकशी करणार - प्रकाश मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 2:32 AM

खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना चौव्हान बिल्डर्स इंडिया हौसिंग डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड यांनी आयुर्विमा महामंडळा यांना संबंधित जमीन तारण देऊन पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यास, विशेष फसवणूक तपासणी अधिकाऱ्यांकडे (एसएफआयओ) हे प्रकरण सोपविण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानसभेत दिली.

मुंबई : खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना चौव्हान बिल्डर्स इंडिया हौसिंग डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड यांनी आयुर्विमा महामंडळा यांना संबंधित जमीन तारण देऊन पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यास, विशेष फसवणूक तपासणी अधिकाऱ्यांकडे (एसएफआयओ) हे प्रकरण सोपविण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानसभेत दिली.या प्रकरणी भाजपाचे अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. महेता म्हणाले, खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टी पुनर्विकास समिती, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकडून सांताक्रुझ पश्चिम येथील व्हिलेज सांताक्रुझ येथे चौव्हान बिल्डर्स इंडिया हौसिंग डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी देवधर असोसिएट वास्तुविशारद यांच्या मार्फत विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत सादर केलेला प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दाखल करून घेतला आहे.जागेची मालकी ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची असून, विकासकाने संबंधित जमीन गहाण ठेवल्यावर तीच जमीन दुसºया विकासकाकडे हस्तांतरीत करता येऊ शकत नाही, अशी तरतूद आहे. या प्रकरणातील चौव्हान या विकासकाने जीवन विमा निगमला जमीन तारण ठेवून त्याच्याकडून पैसे घेतले असतील आणि दुसºया विकासकाला काम हस्तांतरित केले असेल तर त्यासंदर्भात विशेष अधिकाºयांमार्फत चौकशी करण्यात येईल.भविष्यात शासनाच्या जमीनीवर झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना विकासकांनी जमीन तारण ठेवताना राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक राहील. तशी तरतूद कायद्यात केली जाईल, असे मेहता म्हणाले.ठाणे-बेलापूर मार्गाचे काम सुरू करणारमुंबई : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे- बेलापूर मार्गावरील विटावा ते कोपरी दरम्यान खाडीपुलाची उभारणी करणे तसेच कळवा ते आत्माराम पाटील चौक रेतीबंदर दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण व सर्व्हिस रोड हे प्रकल्प मार्गी लावण्यासंदभार्तील कारवाई तातडीने करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली. या संदर्भात सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

टॅग्स :प्रकाश मेहता