'मागील सरकारने 'शिक्षणाच्या आयचा घो' अशी परिस्थिती केली होती'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 10:41 PM2020-02-08T22:41:41+5:302020-02-08T22:41:52+5:30

शिक्षकभारतीच्या राज्यव्यापी अधिवेशनाला शरद पवारांची उपस्थिती 

'The previous government made the situation of' income of education ', Sanjay raut | 'मागील सरकारने 'शिक्षणाच्या आयचा घो' अशी परिस्थिती केली होती'

'मागील सरकारने 'शिक्षणाच्या आयचा घो' अशी परिस्थिती केली होती'

googlenewsNext

मुंबई:  गेल्या ५ वर्षांत सत्तेत असलेल्या सरकारने काय केले याचे उत्तर द्यायचे झाले तर त्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला असे सांगत संजय राऊतांनी मुंबईतील राज्यव्यापी शिक्षकभारती अधिवेशनात भाजपवर सडकून टीका केली. या शब्दाला सेन्सॉर मान्यता असल्याने आपण हा शब्द इथे वापरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  मागील पाच वर्षात शिक्षण क्षेत्रात विष पेरण्याचा प्रयत्न झाला, विषाचा प्रवाह निर्माण झाला. या काळात पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला, त्यातून विद्यार्थ्यांची डोकी खराब करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच काय तर मागील सरकारात शिक्षकाला राजकीय कार्यकर्ता बनवून गुलाम बनवण्याचा प्रयत्न झाल्याची टीकाही त्यांनी. शिक्षकांचा वापर राजकीय स्वार्थासाठी न करता त्यांना महाराष्ट्र घडविण्याचे त्यांचे काम नवीन सरकारच्या काळात करून दिले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षभारती  राज्यव्यापी या कार्यक्रमात राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.

मुंबईतील राज्यव्यापी शिक्षकभारती आंदोलनात शिक्षकांच्या समस्यांवर आणि मागण्यांवर बोलताना त्यांनी या मागण्या पूर्ण होण्यासाठी मंत्रालयाबाहेर याचे होर्डिंग लावावे म्हणजे मुख्यमंत्र्यांना याचे गांभीर्य लक्षात येईल असा सल्लाही दिला. यावेळी शरद पवारांचे कौतुक करताना शरद पवार सिर्फ नाम ही काफी है असे सांगत महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा डिलीट उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार उत्तम राज्यकर्ते असून शिक्षकांच्या १०० हून अधिक मागण्यांचे पत्र त्यांनी पहिले आहे आणि त्यावर लाल , हिरव्या शाईने टीका ही केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. शिक्षण खाते हे सगळ्या खात्यांमध्ये क्रमणक एक चे खाते असायला हवे मात्र मागील सरकारच्या काळात काहीही न कळणाऱ्याना शिक्षण खाते मागे पडले मात्र आपल्या सरकारच्या काळात ते आपण क्रमांक एक वर आणत मंत्रालयात येताना शिक्षकांना ताठ मानेने येता येईल असे करू अशी ग्वाही त्यांनी उपस्थित शिक्षक वर्गाला दिली.  

शिक्षकांचे सारे प्रश्न एकाच वेळी सोडविता येणार नाहीत मात्र शिक्षणमंत्री, ग्राम विकास मंत्री, शिक्षक आमदार, मुख्यमंत्री यांची बठक घेऊन प्राथमिकता ठरवून काही प्रश्न तातडीने सोडविण्याची आवश्यकता शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केली. सगळ्या गोष्टींचे सोंग आणता येते मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही असे सांगत अर्थमंत्री अजित पवार असल्याने त्यांना आपण की बघ बाबा या शिक्षकांच्या प्रश्नावर काय करायचे ते ... असे सांगत पवारांनी शिक्षकांना महत्वाच्या प्रश्नावर दिलासा देण्याची खात्री दिली. मागील ५ वर्षात आपण एकही मंत्र्यांकडे गेलो नाही. मात्र शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षणमंत्र्यांकडे गेलो, त्यात मी कमीपणा वाटून घेतला नाही.  त्याचे कारण, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रश्न व नवी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा मला अत्यंत महत्त्वाचा वाटत होता. मात्र एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगितले आणि समजत नसेल तर मग त्याला धडा शिकविण्याची गरज असते. मग मी राऊतांकडे गेलो असे सांगत शरद पवारांनी सांगत उपस्थित शिक्षकांमध्ये एकच हशा पिकविला.  राज्यात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालेले असताना राज्यकर्त्यांनी पाड्या वस्त्यांवरील शिक्षणाकडे लक्ष देणे ही जबाबदारी असते मात्र इथे उलटे होऊन राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा घाट घेतला गेला. शाहू, फुले , आंबेडकरांच्या राज्यात ही गोष्ट दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र आपल्या सरकारच्या काळात आपण हे बदलू अशी खात्री त्यांनी शिक्षकांना देऊ केली. 

शिक्षक भारतीच्या पहिल्या राज्य अधिवेशनात शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून कपिल पाटील यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांच्याकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या मागण्याची निवेदने दिली असून त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. मागील ५ वर्षात अच्छे दिन जाऊन आपले दिन आले आहेत त्यामुळे शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे. 

Web Title: 'The previous government made the situation of' income of education ', Sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.