Join us

वीज कामगार आक्रमक!

By admin | Updated: December 18, 2015 01:19 IST

महावितरण कंपनीचे विभाजन करण्यात येऊ नये, यासाठी आता वीज कामगार आक्रमक झाले आहेत. वीज क्षेत्र बचाव संयुक्त कृती समितीने या विरोधात लढा उभारला असून, या निषेधार्थ

मुंबई : महावितरण कंपनीचे विभाजन करण्यात येऊ नये, यासाठी आता वीज कामगार आक्रमक झाले आहेत. वीज क्षेत्र बचाव संयुक्त कृती समितीने या विरोधात लढा उभारला असून, या निषेधार्थ वांद्रे पूर्वेकडील प्रकाशगड मुख्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.वीज क्षेत्र बचाव संयुक्त कृती समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन वीज मंडळाच्या तीन कंपन्या, तीनपैकी महावितरण कंपनीच्या पुन्हा पाच कंपन्या करण्याचा निर्णय घेत, वीज क्षेत्राचे पूर्णत: खासगीकरण करण्याचे पाऊल शासनाने उचलले आहे. (प्रतिनिधी)मनसे वीज कामगार सेनेसह भारतीय कामगार सेना, बहुजन विद्युत, अभियंता कर्मचारी फोरम, पॉवर फ्रंट, म.रा.वि.म राष्ट्रवादी विद्युत कामगार सेना, स्टेनो टायपिस्ट युनियन, आदिम कर्मचारी संघटना, बेस्ट वर्कर्स युनियन, म.रा.वि.म अधिकारी कर्मचारी संघटना, म.रा.वि.म श्रमिक काँग्रेस आणि कार्यालयीन कर्मचारी संघटना यांनी विभाजनाला विरोध दर्शवला आहे. १८ डिसेंबर रोजी प्रकाशगड येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे.