Join us  

‘विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकला!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:17 AM

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील गोंधळास सुरुवात झालेली आहे. उशिरा लागलेल्या निकालामुळे विद्यापीठाने विधि अभ्यासक्रमाच्या एलएलएम प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी नुकतीच जाहीर केली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील गोंधळास सुरुवात झालेली आहे. उशिरा लागलेल्या निकालामुळे विद्यापीठाने विधि अभ्यासक्रमाच्या एलएलएम प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी नुकतीच जाहीर केली आहे. मात्र १५ जानेवारीला याच सत्राची परीक्षा असल्याने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलने केला आहे.परीक्षेच्या तोंडावर प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अंतिम यादीपर्यंत वाट पाहणाºया विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विधि अभ्यासक्रमाच्या एलएलएमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा अवघ्या २० दिवसांवर असून इतक्या कमी वेळेत अभ्यास करायचा तरी कसा, असा सवाल घेऊन बहुतेक विद्यार्थ्यांनी कुलगुरूंनाच मध्यस्थी करण्यासाठी साकडे घातले आहे.स्टुडंट लॉ कौन्सिलनेही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, एलएलएमच्या प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या यादीत ६० विद्यार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे. याशिवाय आणखी एक यादी विद्यापीठाकडून जाहीर होणार आहे. परिणामी, परीक्षेच्या तोंडावर प्रवेश देणाºया विद्यापीठाने परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे.

टॅग्स :परीक्षामुंबई