Join us  

एमएससीची परीक्षा पुढे ढकलली, विद्यापीठाने तांत्रिक सबब केली पुढे : इतर परीक्षा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:47 AM

मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारपासून सुरू होणा-या अन्य परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या, पण एमएससी मायक्रोबायोलॉजी विषयाची परीक्षा मात्र, तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. २३ जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ९ फेब्रुवारीपासून सुरू होईल.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारपासून सुरू होणा-या अन्य परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या, पण एमएससी मायक्रोबायोलॉजी विषयाची परीक्षा मात्र, तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. २३ जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ९ फेब्रुवारीपासून सुरू होईल.विद्यापीठात अन्य विषयांच्या परीक्षांची सुरुवात २३ फेब्रुवारीपासून करण्यात आली. एलएलएमची परीक्षाही मंगळवारी विद्यापीठाने घेतली, पण न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देता येणार आहे. त्यामुळे एलएलएमच्या परीक्षेला कमी विद्यार्थी बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, एमएससी पेपर एक हा २३ जानेवारीला होणार होता. आता हा पेपर ९ फेब्रुवारीला होईल. २५ जानेवारीचा पेपर २ आता १२ फेब्रुवारीला, २९ जानेवारीचा पेपर ३ आता १४ फेब्रुवारीला, ३१ जानेवारीचा पेपर आता १६ फेब्रुवारीला होईल. तांत्रिक कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलल्याचे विद्यापीठाने सांगितले. प्रत्यक्षात विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाची भेट घेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.... तर विद्यार्थी हितासाठी आंदोलन पुकारणार-एलएलएमची परीक्षा मंगळवारी विद्यापीठाने घेतली, पण न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देता येणार आहे. या प्रकरणी एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी परीक्षा नियंत्रकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुन्हा घेण्यात येणारी परीक्षा केटी परीक्षा म्हणून न घेता, पहिल्या सत्राची परीक्षा म्हणूनच घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून दुसºया सत्राच्या परीक्षांनंतरच पहिल्या सत्राची परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता परीक्षा घेतल्यास आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षा