Pooja Chavan : आता पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट होतेय व्हायरल, पाहा नेमकं काय आहे या पोस्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 01:20 PM2021-02-26T13:20:26+5:302021-02-26T13:34:28+5:30

Pooja Chavan Death Case : पूजा चव्हाणची अखेरची फेसबूक पोस्ट आता चर्चेत आली असून, ती व्हायरल होत आहे. 

Pooja Chavan: Now Pooja Chavan's last Facebook post is going viral, She Criticize Bhalchandra Nemade in her Last Post | Pooja Chavan : आता पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट होतेय व्हायरल, पाहा नेमकं काय आहे या पोस्टमध्ये

Pooja Chavan : आता पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट होतेय व्हायरल, पाहा नेमकं काय आहे या पोस्टमध्ये

googlenewsNext

मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला आता २० दिवस उलटत आले आहेत. तिच्या मृत्यूवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र या प्रकरणाचा तपास (Pooja Chavan Suicide Case) म्हणावा तसा पुढे सरकलेला नाही. दरम्यान, आता पूजा चव्हाणची अखेरची फेसबूक पोस्ट आता चर्चेत आली असून, ती व्हायरल होत आहे.  (Now Pooja Chavan's last Facebook post is going viral, She Criticize Bhalchandra Nemade in her Last Post )

पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील राहत्या इमारतीच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. दरम्यान, पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट समोर आली असून, त्यात तिने या पोस्टमधून हिंदू कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर टीका केली होती. 

पूजा या पोस्टमध्ये म्हणाली होती की, आठ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजिनिअरिंगमध्ये एवढी उन्नत कशी होती, याचा शोध इतिहासकार घेत आहेत. मात्र खान्देशी लेखक "भालचंद्र नेमाडे" हे देशी दारू पिउन त्यावर कादंबरी लिहीत आहेत. असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध. असे तिने आपल्या शेवटच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते.  पूजा चव्हाणने ही पोस्ट १८ जानेवारी रोजी संध्याकाळी फेसबूकवर शेअर केली होती. 

दरम्यान, या प्रकरणात आरोप होत असलेले राज्य सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून सरकारवर चौफेर दबाव टाकण्यात येत आहे. काल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली होती.   
 
कोण होती पूजा चव्हाण
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

Read in English

Web Title: Pooja Chavan: Now Pooja Chavan's last Facebook post is going viral, She Criticize Bhalchandra Nemade in her Last Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.