Join us  

पोलिसाकडून पोलीस महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:06 AM

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पोलीस हवालदाराने पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पोलीस हवालदाराने पोलीस शिपाई महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. याप्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

....................................

असभ्य वर्तन करणाऱ्या पोलिसाची चौकशी

मुंबई : रे रोड येथील हॉटेलमधील कर्मचाऱ्यासोबत मद्यधुंद अवस्थेत असभ्य वर्तन करणाऱ्या डोंगरीतील पोलीस शिपायाच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले.

................................................

पूर्ववैमनस्यातून डाेक्यात चाॅपरने वार

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील परिसरात पूर्ववैमनस्यातून साेमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सुरेश राजमाने (४७) यांच्या डोक्यात चॉपरने वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बोरिवली पोलीस अधिक चाैकशी करत आहेत.

................................................