Join us

बनावट नोटांप्रकरणी पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला

By admin | Updated: July 4, 2015 00:56 IST

बनावट नोटांप्रकरणी चारकोप पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना होणार आहे. या नोटांची लिंक तिकडे असल्याने पोलिसांचे आयटी तसेच दहशतवादविरोधी पथकही

मुंबई : बनावट नोटांप्रकरणी चारकोप पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना होणार आहे. या नोटांची लिंक तिकडे असल्याने पोलिसांचे आयटी तसेच दहशतवादविरोधी पथकही या प्रकरणी सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.चारकोप पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी सोनाबानू रामजन मुल्ला (२८), अन्वर ऊर्फ डबलू डालू शेख (२५), दाबिरूल ऊर्फ छबी इरफान शेख (२२), सनाउल ऊर्फ डब्लू लुलूम शेख (१९) आणि बफिऊल रहमान ऊर्फ बापा सलाम शेख (२१) यांना अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या बनावट नोटा पश्चिम बंगालमधून आणल्याचे समोर आले. त्यानुसार या टोळी माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी चारकोप पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला रवाना होणार आहे. चारकोप पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप रावराणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक संशयित आरोपींपैकी दाबिरूल ऊर्फ छबी इरफान शेख हा गोरेगाव पश्चिमच्या भगतसिंग नगरमध्ये राहत होता. कडिया काम करणाऱ्या शेखने इतरांनाही याच ठिकाणी थारा दिला. हे सर्व एकत्रच राहत होते. पश्चिम बंगालहून त्यांनी साडेचार लाखांच्या बनावट नोटा आणल्या होत्या. ज्या चलनात आणल्यास एकूण रकमेपैकी त्यांना चाळीस टक्के कमिशन मिळत असल्याचे त्यांनी पोलिसांकडे कबूल केले आहे. त्यानुसार अधिक चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)