Join us  

दीर अन् वहिनी गेले पळून, पोलिसांनी आठवडाभरात काढले शोधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:22 AM

चुलत भावाच्याच बायकोला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोघे पळून गेल्याची घटना माजगाव येथे घडली. मात्र, या दोघांना पोलिसांनी आठवडाभरात शोधून काढले आहे.

मीरा रोड : चुलत भावाच्याच बायकोला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोघे पळून गेल्याची घटना माजगाव येथे घडली. मात्र, या दोघांना पोलिसांनी आठवडाभरात शोधून काढले आहे.माजगाव येथील भानुदास पांडुरंग पष्टे (२६) याचे बाजूच्याच पारतळे या गावातील दीपाली (२२) या तरुणीवर प्रेम होते. या दोघांनी प्रेमविवाह केला. वर्षभरातच भानुदासचा चुलतभाऊ धीरज जानू पष्टे (२२) हा दीपालीला आवडू लागला. नवºयाच्या नकळत ती धीरजला अधूनमधून भेटत असे. मात्र, गावकºयांच्या नजरा चुकवून भेटणे शक्य होत नसल्याने दीपालीने नवºयाला सोडून धीरजबरोबर पळून जाण्याचा निर्णय घेतला. सरळगाव येथे दवाखान्यात जात असल्याचे सांगून ती धीरजबरोबर पळून गेली. आपली बायको पळून गेल्याचे समजल्यावर भानुदासने पोलीस स्टेशन गाठून बायको हरवल्याची तक्र ार केली. तर, धीरजही गावातून बेपत्ता झाल्याने त्याचा भाऊ भरत यानेही पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही तात्काळ तपास करत पोलीस हवालदार खोमणे, खेडकर आणि महिला पोलीस शिपाई पवार यांनी खारघर, नवी मुंबई येथून दोघांना ताब्यात घेतले.