Join us  

मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारणार ‘पॉड’ हॉटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 5:22 AM

प्रवाशांना दिलासा : तात्पुरत्या निवासासाठी लहान खोल्यांची व्यवस्था, बारा तास राहण्याची सोय उपलब्ध

मुंबई : लांब पल्लांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. या पॉड हॉटेलमध्ये तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था प्रवासांसाठी उपलब्ध होईल.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई सेंट्रल स्थानकावर अत्याधुनिक, आरामदायी, आलिशान अशा लहान आकाराची खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या खोल्यांमध्ये अनेक जीवनावश्यक गरजेसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा मिळणार आहेत. या खोलीमध्ये प्रवाशांना कमाल १२ तासांची विश्रांती करता येईल. आयआरसीटीसीकडून अशा ३० पॉड (खोल्या)ची उभारणी करण्यात येईल. आयआरसीटीसीकडून या संदर्भात पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला पश्चिम रेल्व प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पॉडची सर्वप्रथम संकल्पना जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली. देशात सर्वप्रथम अंधेरी शहरात २०१७ साली पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात टिष्ट्वट केले आहे. गोयल म्हणाले की, देशातील रेल्वे स्थानकावरील हे पहिले पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बनविण्यात येईल. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनच्या पॉड हॉटेल उभारण्यात येईल. प्रवाशांना येथे राहण्याची उत्तम सोय होणार आहे.या विशेष सुविधांचा घेता येणार लाभचार हजार चौरस फुटांच्या जागेवर पॉड हॉटेलची उभारणी करण्यात येईल. यामध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असतील. हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल.च्मुंबई सेंट्रल स्थानकावर उभारण्यात येणाºया पॉडची सुविधा यशस्वी ठरल्यास, इतर ठिकाणीही अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.