Join us  

‘पीएनबी’त महाघोटाळा मुंबई शाखेतील घटना; निरव मोदीसह चौघे देशाबाहेर फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 5:48 AM

सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक निरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले आहेत. अधिका-यांशी संगनमत करूनच घोटाळा करण्यात आला आहे. विजय मल्ल्यापेक्षाही मोठा घोटाळा दिसत आहे.

मुंबई/नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक निरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले आहेत. अधिका-यांशी संगनमत करूनच घोटाळा करण्यात आला आहे. विजय मल्ल्यापेक्षाही मोठा घोटाळा दिसत आहे.बँकेनेच स्वत:हून यासंबंधीचे पत्र शेअर बाजाराला पाठविले आहे. १७७.१७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे, सुमारे ११,४२७ कोटी रुपये संबंधितांनी विदेशात राहून वळते केल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, बँकेने त्यात संशयितांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थात, बँकेतील आधीच्या २८0 कोटींच्या घोटाळ्याच्या सीबीआयने सुरू केलेल्या तपासात निरव मोदीचे नाव आले होते. त्यामुळे तोच या घोटाळ्याचा सूत्रधार असावा, असा अंदाज आहे.मल्ल्यापेक्षाही मोठा घोळयाबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.सर्वसामान्यांची रक्कम धोक्यातपीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.बँकेच्या समभागधारकांचेही ३ हजार कोटींचे नुकसानपैसा वळता करण्यासाठी बँकेकडून ‘अंडरटेकिंग’ नोट मिळविण्यात आली आणि तिच्याआधारे संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जेही मिळवल्याची शक्यता पीएनबीने व्यक्त केली आहे.बँकेतील गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात या कर्मचाºयांच्या मदतीने ‘अंडरटेकिंग’ पत्र मिळवत निरव मोदी, निशाल मोदी, अमी मोदी व मेहुल चोकसी या हिरे व्यावसायिकांनी याच ब्रीच कॅन्डी शाखेत २८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ५ फेब्रुवारीला समोर आले होते.हा महाघोटाळा उघड झाल्यानंतर देशातील गितांजली, गिन्नी, नक्षत्र आणि निरव मोदी या चार प्रमुख ज्वेलर्सवर तपास यंत्रणांची नजर आहे. तपासणी सुरु आहे. या महाघोटाळ्यामुळे बुधवारी बँकेच्या समभागधारकांचेहीसुमारे ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.तीन बँका संकटातया घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँकमुंबई