Join us  

प्लॅस्टिकबंदीची कारवाई प्रभावीपणेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:33 AM

प्लॅस्टिकबंदी कायद्यातील तरतुदीनुसार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिकविरुद्ध प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.

मुंबई : प्लॅस्टिकबंदी कायद्यातील तरतुदीनुसार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिकविरुद्ध प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. प्लॅस्टिकला पर्याय असणाऱ्या प्लॅस्टिक वस्तू व प्लॅस्टिक पुनर्चक्रीकरण याबाबत नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया, वरळी येथे आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.रामदास कदम म्हणाले की, प्लॅस्टिक व थर्माकोलमुळे पावसाळ्यात पाणी साचणे, जनावरांच्या पोटात प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडणे, तसेच यामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ºहास या बाबींचा विचार केला असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचे दुष्परिणाम विशेषत: पावसाळ्यात नाले तुंबण्याचे प्रकार जाणवतो. प्लॅस्टिकबंदीमुळे अशा प्रकारच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळणार आहे.आयुक्त अजय मेहता म्हणाले की, दररोज ९ हजार मेट्रिक टन कचरा गोळा करून, त्याची क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत होती. महापालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ती ७ हजार मेट्रिक टनापर्यंत आणली आहे, आणखीन तो ६ हजार मेट्रिक टनापर्यंत आणण्याचा महापालिकेचा मानस आहे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील ४० शहरांमधून २० टक्के कचरा हा प्लॅस्टिकचा असतो, तर एकट्या मुंबईतून ७०० मे. टन प्लॅस्टिकचा कचरा निर्माण होतो व त्याची पालिका विल्हेवाट लावते.अभिनेत्री काजोल देवगण म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या समतोलासाठी प्रबोधन होत असून, पाल्यांना विरासत म्हणून पैसे अथवा मालमत्ता देण्याबरोबरच चांगले पर्यावरण दिले, तर त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. अभिनेते अजय देवगण यांनीही नागरिकांनी या कामी हातभार लावण्याचे आवाहन केले. दरम्यान, प्रदर्शन २४ जूनपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहील.