Join us  

प्लॅस्टिकबंदी : महापालिकेने ठोठावला १९ लाख ६५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:04 AM

प्लॅस्टिकबंदीनंतरही प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या मुंबईकरांविरोधात महापालिकेची कारवाईची मोहीम सुरू असून, २ जुलैपर्यंत हाती आलेल्या आकेडीवारीनुसार, आठ दिवसांत एकूण २९ हजार ५३४ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या.

मुंबई : प्लॅस्टिकबंदीनंतरही प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या मुंबईकरांविरोधात महापालिकेची कारवाईची मोहीम सुरू असून, २ जुलैपर्यंत हाती आलेल्या आकेडीवारीनुसार, आठ दिवसांत एकूण २९ हजार ५३४ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. १ हजार ५०७ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, १९ लाख ६५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यातील न्यायालयीन प्रकरणांची संख्या ४२ आहे. दरम्यान, मुंबईकर प्लॅस्टिकचा वापर टाळत असून, कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे.२३ जून रोजी ६० आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. २७ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. २४ जून रोजी ८६७ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. ६१७ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. ३ लाख ९० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. २५ जून रोजी १,७०८ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. १३८ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, ३ लाख १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. २६ जून रोजी ५,८७९ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या असून, ३२४ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या प्रकरणी ४ लाख ९५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. २७ जून रोजी ६,१६१ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. २८४ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, ३ लाख २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.२८ जूनला ४,५९० आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. ४१ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त केले. १ लाख २५ हजार रुपये दंड ठोठावला. २९ जूनला ५,६६४ आस्थापनांना भेटी दिल्या असून, २० किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त केले. १ लाख ३५ हजार रुपये दंड ठोठावला, तर ३० जूनला ४,५०५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. ५६ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त केले असून, १ लाख २५ हजार रुपये दंड ठोठावला .दरम्यान, कारवाई, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता, मुंबईकरही कापडी पिशव्यांच्या वापरावर भर देत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी